शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना विमा सुरक्षा कवच द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

सरपंच, उपसरपंचांचे तहसीलदारांना निवेदन भद्रावती : सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोविड काळात विमा सुरक्षा कवच देण्यात ...

सरपंच, उपसरपंचांचे तहसीलदारांना निवेदन

भद्रावती : सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोविड काळात विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, या मागणीबाबतचे निवेदन तहसीलदार महेश शितोळे यांना भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांच्याद्वारे देण्यात आले.

सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मागील वर्षभरापासून प्रशासकीय कर्मचाऱ्यांसारखे आपापल्या गावात फ्रंटलाइन वर्कर म्हणून गाव स्तरावर गावकऱ्यांच्या जीवनासाठी नि:स्वार्थ सेवा प्रदान करीत आहेत.

गावांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच गाव सुरक्षित ठेवण्याकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहेत. हे करीत असताना कोणत्याही बांधवांना व भगिनींना कोरोनाची लागण झाली आणि त्यात ते दगावले तर त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट येईल व कुटुंब उघड्यावर पडेल आणि म्हणूनच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या कुटुंबाला सहानुभूतीचा आधार म्हणून विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने सरपंच, उपसरपंच, सदस्यांबाबत सुरक्षेच्या हेतूने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आपल्या स्तरावर ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना विमा सुरक्षा कवच व इतर कर्मचाऱ्यांसारखी मदत तातडीने प्रदान करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी चंदनखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे, पानवडाळा ग्रामपंचायत सरपंच प्रदीप शंकर महाकुलकर, डोंगरगाव खडीचे उपसरपंच मुकेश भास्कर तसेच अन्य उपसरपंच, सरपंच व सदस्य उपस्थित होते.