शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीचा मुद्दा पुन्हा आमसभेत गाजणार

By admin | Updated: March 18, 2016 01:08 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली असून ही वाढ जनतेसाठी अन्यायकारक आहे.

आंदोलन सुरूच : करवाढीवरून आंदोलनकर्ते आक्रमकचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली असून ही वाढ जनतेसाठी अन्यायकारक आहे. ही करवाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडी व नागरिकांचे गांधी चौकात मागील ११ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना निवेदन देऊन चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र मालमत्ता करवाढीसंदर्भात विशेष सभा बोलावूनच चर्चा करावी, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरल्याने १८ मार्चला मनपात आमसभा होत आहे. करवाढ रद्द करण्याबाबत आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ही आमसभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली आहे. दुसरीकडे करात वाढ केली नसल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी नागरिकांनाही चार ते पाच पट वाढलेले करपत्रक येत असल्याने नागरिकांचीही ओरड सुरू आहे. जनतेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी व करवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडी व नागरिकांनी गांधी चौकात ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मनपाच्या स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी आंदोलनकर्त्यांना निवेदन देऊन चर्चेसाठी बोलाविले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी विशेष सभा बोलावणार असाल तरच चर्चेसाठे येऊ, असा पवित्रा घेतल्याने आंदोलन सुरूच राहिले. आज गुरुवारी गोंडराजे विरेंद्रशहरा आत्राम, रमेश काळबांधे, सचिन नवघरे, महेंद्र खनके, शेरखान समशेर खान, अमित लडके, स्वप्नील देव, सोनू चौधरी हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मालमत्ता करवाढीवर पुन्हा चर्चा करण्यासाठी मनपाच्या सभागृहात आमसभा बोलाविण्यात आली आहे. आंदोलनकर्ते नगरसेवक मालमत्ता करवाढीबाबत आक्रमक झाले असल्याने ही आमसभा चांगलीच वादळी होणार आहे. (शहर प्रतिनिधी)