गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन जिल्ह्यासाठीही लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:48+5:30

पर्यावरणात आज मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अवैध वृक्षतोड व रेतीचे खनन आदी कारणांमुळे बारमाही वाहणाºया जिल्ह्यातील नद्या कोरड्या होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे भविष्यासाठी नद्यांचे अस्तित्व कायम ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यासाठी हैद्राबाद येथील इन्स्टिट्युट ऑफ फॉरेस्ट बायोडायव्हरसीटी संस्थेने जिल्हा नियोजन भवनात कार्यशाळा आयोजित करून सूचना मागविल्या.

The Godavari River is also beneficial for the district | गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन जिल्ह्यासाठीही लाभदायक

गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन जिल्ह्यासाठीही लाभदायक

googlenewsNext
ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांची कार्यशाळा : हैद्राबाद वन जैवविविधता संस्थेने मागविल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा व अन्य लहान नद्यांसाठी गोदावरी नदी नैसर्गिक परिसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परंतु, या नदीचा वाहता प्रवाह थांबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. मात्र, शासनाने गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले. या नदीचे पुनरूज्जीवन चंद्रपूर जिल्ह्यासाठीही लाभदायक ठरणार आहे, असा सूर वन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
हैद्राबाद येथील भारतीय वन जैवविविधता संस्थेने मंगळवारी आयोजित जिल्हा नियोजन भवनातील कार्यशाळेत वन अधिकाºयांनी सदर संस्थेला अनेक सूचना दिल्या. यावेळी मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, हैद्राबाद संस्थेचे डॉ. आभा राणी, प्रवीण सिंह, चंद्रपूर वन वृत्तातील डीसीएफ, डीएफओ, एसीएफ, आरओ, बीट गार्ड, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत विभाग व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणात आज मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अवैध वृक्षतोड व रेतीचे खनन आदी कारणांमुळे बारमाही वाहणाºया जिल्ह्यातील नद्या कोरड्या होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे भविष्यासाठी नद्यांचे अस्तित्व कायम ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यासाठी हैद्राबाद येथील इन्स्टिट्युट ऑफ फॉरेस्ट बायोडायव्हरसीटी संस्थेने जिल्हा नियोजन भवनात कार्यशाळा आयोजित करून सूचना मागविल्या. राज्य शासनाच्या वतीने नदी पुनरूज्जीवन प्रकल्प तयार करण्यात आला. गोदावरी ही नदी चंद्रपूर व गडचिरोली सीमावर्ती भागातून वाहते. त्यामुळे नदी काठावरील आणि त्याला जोडणाऱ्या जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, प्राणहिता तसेच उपनद्यांच्या काठावरील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी ही संस्था वन अधिकाऱ्यांकडून माहिती संकलित करत आहेत. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी विकास आराखडा तयार करत असलेल्या इन्स्टिट्युट ऑफ फॉरेस्ट बॉयोडायव्हरसीटी संस्थेच्या तज्ज्ञांनी गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी जल मृदा संधारण आणि रोपवनांची कामे कशी करावी, याची माहिती दिली.

या प्रकल्प अंतर्गत वन क्षेत्रात कोणती कामे करता येऊ शकतात, याची माहिती वन विभागाच्या बीटची जबाबदारी सांभाळणाºया कर्मचाºयांकडून मागविण्यात आली. कार्यशाळेत तज्ज्ञांनी विविध पैलुंची माहिती दिली. नदी पुनरूज्जीवन ही महत्त्वाची बाब आहे. नद्या या प्राणी पक्षी आणि मानवासाठी जीवनदायीनीचे काम करतात. त्यामुळे तीचे संगोपन आणि संरक्षण आवश्यक करणे प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.
-एस. व्ही. रामाराव,
मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर

गोदावरीच्या नदी पुनरूज्जीवनाचे लाभ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही मिळणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये, याकरिता वन अधिकाºयांकडून माहिती संकलीत करण्यात आली. यावर सखोल संशोधन केल्यानंतर प्रकल्प कार्यान्वित केल्या जाणार आहे.
-प्रवीण चव्हाण, वैज्ञानिक भारतीय वन जैवविविधता संस्था, हैद्रराबाद

नद्या म्हणजे जीवनदायिनी
गोदावरी नदीची लांबी १४६५ किलोमीटर आहे. त्याच्या ८ उपनद्या आहेत. एकूण लांबीच्या ४८.७७ टक्के क्षेत्र हे महाराष्टÑात असून १ लाख ४७ हजार ३२० चौरस किलोमीटर इतके आहे. त्यापैकी ६० टक्के क्षेत्र शेती आणि ३० टक्के वनक्षेत्र आहे. गोदावरी नदीच्या पुनरूज्जीवन संदर्भात काम सुरू करण्यात येणार आहे. त्या कामाचा विकास आराखडा सध्या तयार करण्यात येत आहे. त्यासाठी हैद्राबाद येथील संस्थेला जबाबदारी देण्यात आली. वन विभागाने या उपक्रमासाठी आवश्यक ती माहिती संकलित करणासाठी काम सुरू केले. नद्या म्हणजे जीवनदायीनी असल्याने वन अधिकाºयांच्या माहितीला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी उपाययोजना
गोदावरी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीशी संबंध येतो. नदीकाठावरील अनेक गावांमध्ये आजही पारंपरिक शेती केली जाते. नदीचे पुनरूज्जीवन करताना परिसरातील शेतकºयांना कसा लाभ होईल आणि शेतीच्या परिसरात फळझाडांची शेती करू शकतील, याबाबतच्या सूचनाही वन अधिकाºयांनी केल्या. ही माहिती शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या प्रपत्रातून भरून देण्यात आली. डॉ. आभा राणी यांनी वन अधिकाºयांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ अधिकाºयांनी बºयाच सूचना केल्या.

Web Title: The Godavari River is also beneficial for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.