हिडमाचे उदात्तीकरण, गाण्यावर थिरकणे हे कायद्याचे उल्लंघन; दाखल होईल गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:16 IST2026-05-13T15:16:04+5:302026-05-13T15:16:45+5:30

Chandrapur : जहाल नक्षलवादी कमांडर हिडमा हा केवळ गुन्हेगार नसून, बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा तो धोकादायक चेहरा आहे. सन २००९ ला त्याच्या संघटनेला बॅन केले आहे.

Glorification of Hidma, dancing to the song is a violation of the law; a crime will be registered | हिडमाचे उदात्तीकरण, गाण्यावर थिरकणे हे कायद्याचे उल्लंघन; दाखल होईल गुन्हा

Glorification of Hidma, dancing to the song is a violation of the law; a crime will be registered

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जहाल नक्षलवादी कमांडर हिडमा हा केवळ गुन्हेगार नसून, बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा तो धोकादायक चेहरा आहे. सन २००९ ला त्याच्या संघटनेला बॅन केले आहे. त्यामुळे त्याचे सोशल मीडिया किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत होणारे उदात्तीकरण आता पोलिसांच्या रडारवर आहे. परिणामी त्यांच्या गाण्यावर थिरकणे किंवा त्याचे समर्थन करणे हा केवळ करमणुकीचा भाग नसून, कायद्याचे उल्लंघन आहे. 

गडचिरोलीत दाखल झालेले गुन्हे हे केवळ कारवाईसाठी नसून समाजात जनजागृती करण्यासाठी आहेत. नक्षलवाद्यांना 'हिरो' बनवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे कायदेशीर परिणाम किती गंभीर असू शकतात, हे तरुणांना कळावे यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

सोशल मीडिया, विशेषतः यूट्यूबवर हिडमाच्या नावाचा वापर करून तरुणांना आकर्षित करणारे जे व्हिडिओ आणि गाणी आहेत, ती पोलिसांच्या रडारवर आहेत. आम्ही अशा प्रकारचा घातक मजकूर यूट्यूब प्रशासनाला कळवून तो तातडीने हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक कंटेंट आतापर्यंत डिलिट केले आहेत. नक्षलवाद्यांच्या डिजिटल प्रसाराला चाप लावण्यासाठी आम्ही 'इंटेलिजन्स ब्युरो' आणि 'एनआयए' यांसारख्या केंद्रीय संस्थांशी संपर्कात आहोत. तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करून नक्षलवाद्यांची ही विचारसरणी पसरवणाऱ्या मुळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक इश्वर कातकडे, परीवेक्षाधिन पोलिस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, एसडीपीओ प्रमोद चौगुले, एसडीपीओ सुधीर नंदनवार एलसीबी पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सर्वच एसडीपीओ उपस्थित होते.


 

Web Title : नक्सली नेता हिडमा का महिमामंडन अवैध; प्राथमिकी दर्ज होगी।

Web Summary : नक्सली कमांडर हिडमा का महिमामंडन, जिसमें उनके बारे में गाने पर नाचना भी शामिल है, अवैध और दंडनीय है। पुलिस सोशल मीडिया सामग्री की निगरानी कर रही है और नक्सली प्रचार को रोकने और समर्थकों के खिलाफ कार्रवाई करने के लिए केंद्रीय एजेंसियों के साथ सहयोग कर रही है।

Web Title : Glorifying Naxal leader Hidma illegal; FIR will be filed.

Web Summary : Glorifying Naxal commander Hidma, including dancing to songs about him, is illegal and punishable. Police are monitoring social media content and collaborating with central agencies to curb Naxal propaganda and take action against supporters.