शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लहान कंत्राटदारांना ४० टक्के कोटेशनची कामे द्या

By admin | Updated: December 22, 2014 22:44 IST

वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी जुलै २०१३ पासून येथील इक्वायरी, कोटेशन स्वरुपाची कंत्राटी कामे देणे बंद केल्यामुळे येथील सुमारे ५० ते ८० कंत्राटदारावर उपासमारीची

चंद्रपूर : वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी जुलै २०१३ पासून येथील इक्वायरी, कोटेशन स्वरुपाची कंत्राटी कामे देणे बंद केल्यामुळे येथील सुमारे ५० ते ८० कंत्राटदारावर उपासमारीची पाळी आली आहे. कामावर जगणारा मजूर वर्ग कामासाठी भटकू लागला आहे. येथील ३० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारे कंत्राटदार मात्र मोठ्या प्रमाणात लाखोंच्या निविदा प्राप्त करीत आहेत. व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता व विभाग प्रमुख आपली भागीदारी ठेवून लुटमार करीत आहेत. त्यामुळे वीज निर्मिती केंद्राला व संपत्तीला धोका निर्माण झाला आहे. येथील स्थानिक बेरोजगार, अभियंता, सेवा सहकारी संस्था, प्रकल्पग्रस्त कंत्राटदार, महिला बचत गट या लहान कंत्राटदारांना ज्यांचे भांडवल मर्यादित आहे, ते टेंडर घेऊ शकत नाही, अशा स्थानिकांंवर अन्याय होत आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर विधिमंडळ कार्यकाळात सामूहिक बैठक लावून येथे वीज कंपनीने बंद केलेले कोटेशन, इंक्वायरीची कामे ४० टक्के सुरू करण्याचा निर्णय घेवून न्याय द्यावा, या मागण्यांसाठी स्मॉल स्केल कॉन्ट्रक्टर असोसिएशन चंद्रपूरच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादर करण्यात आले. या आंदोलनात ३० ते ५० लहान कंत्राटदार, बेरोजगार अभियंता, प्रकल्पग्रस्त कंत्राटदार, महिला बचत गटाच्या सदस्य सहभागी झाल्या होत्या. यावेळी लहान कंत्राटदारांना वर्षात प्राप्त होणाऱ्या एकूण फंडाच्या ४० टक्के रक्कम कोटेशन वर्ककरीता निश्चित करून देण्यात यावी व एकूण कामाच्या ४० टक्के कामे कोटेशन, इंक्वायरी उपलब्ध करून देण्यात यावे, ज्या सभासदांकडे कामे नाहीत त्यांना तत्काळ तीन ते पाच लाख रुपये किमतीचे कामे देण्याची मागणी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)