शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी नव्या सामर्थ्यांचा शोध घ्यावा

By admin | Updated: March 15, 2015 00:58 IST

आजची तरुण पिढी सर्व बाबतीत आकाशाला गवसणी घालण्याची मानसिकता बाळगून आहे. त्यांना दिशा देण्याची गरज आहे.

बल्लारपूर : आजची तरुण पिढी सर्व बाबतीत आकाशाला गवसणी घालण्याची मानसिकता बाळगून आहे. त्यांना दिशा देण्याची गरज आहे. यात प्रशिक्षण शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत असून मुलींनी नव्या सामर्थ्यांच्या शोध घ्यावा, असे आवाहन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी कळमना येथील प्रबोधन शिबिरादरम्यान मार्गदर्शनातून केले.बल्लारपूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कळमना येथील ग्रामपंचायत कार्यालयात किशोरी मुलींचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा कुंटलावार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.हरिश गेडाम, अ‍ॅड. मेघा भाले, बल्लारपूर पंचाययत समितीच्या माजी उपसभापती सुमन लोहे, डॉ. विवेक लांजेकर, वर्षा रामेटेके, ग्राम पंचायत सदस्य छाया तलांडे, वैशाली दुधाने, सविता भुते यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, किशोरवयीन मुलींची शारिरीक व मानसिक वाढ होताना काहीसे दडपण येते. मात्र योग्य वेळी वैद्यकीय सल्ला मिळाल्यास त्यांच्यातील दडपण कमी होते. यावेळी आईलाच मैत्रिणीची भूमिका पार पाडावी लागते. दरम्यान अ‍ॅड. मेघा भाले यांनी कायदेविषयक, डॉ. विवेक लांजेकर यांनी वैद्यकीय उपचार यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सरीता भुते यांनी तर आभार वैशाली दुधाने यांनी मानले. अंगणवाडी कार्यकर्त्यां, मदतनिस व मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)