शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज

By admin | Updated: March 19, 2016 00:45 IST

घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे,...

नवरगाव : घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे, कधी नियोजनाच्या अभावामुळे, कधी कालवा फुटल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक धोक्यात येते. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज असून काही नागरिकांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.घोडाझरी तलाव इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आला. त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कालवे (कॅनल) तयार करण्यात आले. तेव्हा घोडाझरी तलावावर अवलंबून असणारे शेतकरीही कमी असल्याने सर्वांना पाणी मुबलक मिळत होते आणि धान पिकही हमखास येत होते. या तलावावर दिवसेंदिवस अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीची आराजी वाढली. आता जवळजवळ सात हजार हेक्टर शेतजमीन अवलंबून आहे. तलाव तेवढाच आहे. कालवेही तेच आहेत. मात्र जे-जे कालवे तयार केले होते, ते जीर्ण झाले असून विविध ठिकाणी फुटलेले आहेत. बऱ्याच ठिकाणाची माती वाहून गेली आहे. काही ठिकाणची माती नहरात (कालव्यात) पडलेली असल्याने ते बुडालेले आहे. बऱ्याच वर्षापासून नहराचे काम हातात घेण्यात आले नाही. काही भागात नहराचे काँक्रीटीकरण केले. मात्र दोन-अडीच इंचचा थर असल्याने त्यालाही भेगा जावून मोठमोठे खड्डे पडले. एकूण कामच निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.बऱ्याच ठिकाणी नहराची उंची कमी असल्याने जास्त पाणी सोडायचे म्हटले तर वरुन पाणी वाहून नहर फुटण्याची भीेती असते. म्हणूृन संबंधित विभाग आहे, त्या परिस्थितीत पाण्याचे वितरण करीत असल्याने शेवटपर्यंत पाणीच पोहचत नाही. आणि पर्यायाने घोडाझरी नहराच्या पाण्यावर अवलंबून असलेली धान शेती पाण्याअभावी नष्ट होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.ही सर्व समस्या लक्षात घेवून नवरगाव येथील शेतकरी बांधवांनी सदर नहराच्या दुरस्तीच्या कामाच्या संदर्भात सिंचाई शाखा सिंदेवाहीचे सहायक अभियंता डी.जी. रिजवी यांची भेट घेऊन, त्यांना शिष्टमंडळाच्या वतीने १७ मार्चला विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये नवरगाव येथील माजी सरपंच दीपक चहान्दे, दादाजी चनघनवार, बासीद शेख, संजय बोडणे, नामदेव बोरकर, मनोहर सहारे, संजय गभने, जानकीराम कामडी, भोला इदूलवार, उपासराव बोरकर यांचा समावेश होता.अधिकारी व शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली असून घोडाझरी तलावापासून ते गडबोरी-वानेरीपर्यंत नहराच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवून शासनाकडे पाठविले आहे. ते मंजूर होण्यासाठी एक-दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु २०१६ मध्ये दीड ते दोन कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून काही भागातून दुरुस्तीची कामे होणार आहेत.मात्र अधिकचा निधी नसल्याने शासनाने त्या-त्या भागातील ग्रामपंचायतीला पत्र दिल्यास रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत काम केल्यास नागरिकांना काम मिळेल