शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीचे शिवधनुष्य उचलायला सज्ज व्हा

By admin | Updated: May 2, 2015 01:06 IST

जिल्हयात १ एप्रिलपासून दारुबंदी लागू झाली. स्वप्न पूर्ण झाले. लढ्याला यश आले म्हणून एवढ्यावरच थांबू नका ...

चंद्रपूर : जिल्हयात १ एप्रिलपासून दारुबंदी लागू झाली. स्वप्न पूर्ण झाले. लढ्याला यश आले म्हणून एवढ्यावरच थांबू नका तर जिल्हा व्यसनमुक्त करण्याचे हे शिवधनुष्य सामुहिकपणे उचलण्यासाठी सारेजण सज्ज व्हा, असे आवाहन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मारई पाटण ते महाकाली मंदिर या दारुबंदी अभियानाचा समारोप महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून पार पडला. या निमीत्त दारुबंदी चळवळीच्या वतीने ना.सुधीर मुनगंटीवार यांचा डॉ.राणी बंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दारुबंदी केल्याबद्दल महिलांकडून आभार व्यक्त करणारे सह्यांचे पुस्तक देवून या समारंभातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार वामनराव चटप, डॉ.राणी बंग, अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी, प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देतांना पालकमंत्री म्हणाले, दारुबंदीसाठी महिलांनी मोठा लढा दिला, म्हणूनच यश आले. या पूर्ण यशासाठी दारूबंदीसंदर्भातील अनेक कायदयात बदल करणे आवश्यक आहे. या समारंभादरम्यान ना. हंसराज अहीर, माजी आमदार वामनराव चटप, डॉ.राणी बंग, अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व जयश्री कापसेयांचे भाषणे झालीत. या कार्यक्रमास दारुबंदी चळवळीच्या असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)