शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या दिव्यात होतात मृतांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 15, 2015 01:08 IST

शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत.

वरोरा : शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. पालिका प्रशासनाने या सुविधाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रात्री मृतांच्या पार्थिवावर वाहनाचे दिवे लावून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.वरोरा शहरालगत वणी रोड, बोर्डा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व मालवीय वार्डात, अशा तीन स्मशानभूमी आहेत. यामध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने दोन स्मशानभूमीची देखभाल केली जाते. या स्मशानभूमीमध्ये मृतदेह जाळण्यासाठी असलेले लोखंडी स्टँड केव्हाच बेपत्ता झाले आहेत. सहा महिन्यांपासून हातपंप बंद आहेत तर विद्युत दिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. अशा दयनीय अवस्था वणी नाक्याकडील स्मशानभूमीची झाली आहे. नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमीची देखभाल केली जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून या स्मशानभूमीत मुलभुत सोयी कोलमडल्या आहेत. तरीही प्रशासनाने लक्ष देऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रात्री अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास मृताच्या आप्तेष्टांना जनरेटरची व्यवस्था, गॅसबत्ती, इमरजन्सी दिवे घेऊन जावे लागते. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मृताच्या आप्तेष्टांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य त्यासोबतच इतरही साहित्य घेऊन जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.स्मशानभूमीतील हातपंप मागील काही महिन्यांपासून बंद आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतावर अंत्यसंस्कार करणाऱ्या अंगावर पाणी घ्यावे लागते. स्मशानभूमीत पाणी नसल्याने पाणी असलेल्या कॅन घेऊन मृताच्या आप्तेष्टांना स्मशानभूमीत जावे लागत आहे. अशा अनेक कठीण प्रसंगांशी दोन हात करूनच मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)