शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत सुविधांसाठी मूलवासीयांची धडपड

By admin | Updated: July 12, 2017 00:45 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे.

भोजराज गोवर्धन । लोकमत न्यूज नेटवर्कमूल : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचे विविध विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मूल शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. परिणामी शहरवासीयांना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. शासनाकडून शहर विकासाठी करोडो रूपयांचा निधी मिळत आहे. या निधीचे योग्य नियोजन केल्यास विकास कामे मार्गी लागण्यास वेळ लागणार आहे. मात्र यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.१७ सदस्य असलेल्या मूल नगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. १७ पैकी १६ नगरसेवक भाजपाचेच आहेत. केंद्र व राज्यातही भाजपची सत्ता आहे. यामुळेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल शहराचा विकास झपाट्याने करीत आहेत. मूल शहरातील मुख्य मार्गावर प्रवेश करताच एखाद्या मोठ्या शहरात प्रवेश केल्याचा भास नागरिकांना होतो. त्या पद्धतीनेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून शहरातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकाव घेतला पाहिजे. परंतु, तसे होताना दिसून येत नाही, यामुळेच अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अंतर्गत रस्ते, नालीची समस्या कायम असून कंत्राटदाराच्या हुकूमशाहीमुळे अनेक रस्ते व नाल्याचे काम अपूर्ण आहे. मुसळधार पाऊस येताच अनेकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता असते. शहरात घंटागाडी फिरवून जमा केलेला कचरा बसस्थानकाजवळ जमा करण्यात येत आहे. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. आठवडी बाजारातील शौचालयाजवळ मागील अनेक दिवसांपासून मटन मार्केट मधील घाण इतरत्र पसरलेली आहे. यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. यासोबतच शहरात डासांचा प्रादूर्भाव झालेले आहे. डुक्करांचा हौदोस वाढलेला असून याकडेही नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राज्याचे अर्थ, नियोजन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराला विदर्भातील सुंदर व स्वच्छ शहर निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. यामुळेच मूल शहरात करोडो रुपयाचे विकासकामे सुरू आहेत. शहरातील मुख्य मार्गाचा चेहरामोहरा बदललेला आहे. परंतु वॉर्डा-वॉर्डात अनेक समस्या आहेत, त्या सोडविणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देवून अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची आवश्यकता आहे. तसेच मूल शहरात आरोग्य, वीज समस्या आवासून उभ्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता व कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. तांदळाची मोठी बाजारपेठ असलेल्या दूरसंचार निगमची सेवा कुचकामी ठरत आहे. वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष न दिल्यास करोडे रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्या कधी सुटणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, हीच अपेक्षा.एसटी आगाराची मागणी धुळखातमूल : व्यावसायिक दृष्ट्या प्रगत असलेल्या मूल शहरात बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत एसटी बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना वेळेत एसटी बस मिळण्यासाठी मूल येथे एसटी महामंडळाचे आगार देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असली तरी ही मागणी अद्याप पुर्णत्वास आलेली नाही. एस.टी. महामंडळाला वर्षाकाठी लाखो रूपयांचे उत्पन्न देणाऱ्या मूल बसस्थानकावरुन एसटी बसेसच्या ३०० पेक्षा अधिकच्या फेऱ्या आहेत. मूल येथे धानाची मोठी बाजारपेठ असून शहरात न्यायालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालये, उपजिल्हा रुग्णालय, अधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतरही सरकारी कार्यालये आहेत. त्यानिमित्ताने शासकीय कामासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो नागरिक आणि विद्यार्थी दररोज मूल मध्ये येत असतात. आपले काम आटोपून गावाला परत जाण्यासाठी येथील बसस्थानकावर आल्यावर मात्र त्यांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी ुलागत असते. मूल शहराच्या मध्यभागी मोठे बसस्थानक असले तरी येथे येणाऱ्या बसेस या चिमूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथील आगारातून येतात. त्यामुळे बस फेऱ्यांचे नियोजन त्या-त्या आगारातून होत असते. प्रवाशांना त्यांचा वेळेत बस मिळणे आवश्यक आहे. मात्र येथील बसस्थानक बसेससाठी दुसऱ्या आगारावर अवलंबून असते. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेत बस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याचे येथील वाहतूक नियंत्रकाचे म्हणणे आहे. प्रवाशांच्या बसेसची अडचण लक्षात घेता मूल येथे एसटीचे आगार होणे आवश्यक आहे. आगार झाल्यास प्रवाशांच्या संख्येनुसार त्या-त्या मार्गावर बसेस सोडण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. एसटी महामंडळाने एसटी आगारासाठी मूल येथे यापूर्वीच सात एकर जागा खरेदी केल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप मागणी पुर्णत्वास आलेली नाही.