शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच

By admin | Updated: March 14, 2015 01:09 IST

वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती ...

कोरपना: वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. सोबतच विजेच्या भारनियमनामुळे उभी पिके वाळतात. परिणामी,उत्पादनासाठी खर्च करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत असल्याची विदारक स्थिती आहे. अनेकदा पिकांच्या उत्पादनावर होणारा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांबाबतच्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे बळीराजाने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे.मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून उदरनिर्वाहाचा खर्च वाढत चालल्याने महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसणे कठीण झाले आहे. मागील जमाखर्चाचा हिशेब तो मांडू शकत नाही, आणि मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून निष्पन्नही काहीच होत नाही. पेरणीच्यावेळी खत विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने खतांची विक्री होते. बियाण्यांचे दरही वाढत असल्याने जमाखर्चाचा त्याला मेळ घालता येणे अवघड झाले आहे. शिवाय किटकनाशके, तणनाशकांच्या किंमतीही गगणाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांना खते, तणनाशकांची फवारणी करणे परवडत नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैशाची तजवित कशी करायची? असा प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.सध्या शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवीन पेव फुटले असून शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शेतीतील घटत्या उत्पादनामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निव्वळ शेतकऱ्यांचीच शेतात मजूरीच होत असल्याचे भयाणक चित्र पहावयास मिळत आहे. कृषी विभागाच्या योजनांचा मोठा गाजावाजा होत असताना गरजू शेतकऱ्यांना खरेच या योजनांचा लाभ मिळतो का, असलेल्या योजना त्यांना मिळत नसतील तर त्या योजना काय कामाच्या, शेतीच्या नावावर शासन दरबारी मोठी रक्कम खर्च होत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन कमी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील शेतकऱ्यांना अद्यापही शेतीचे कोडे सुटत नाही. उत्पादनाला भाव कमी मिळत असल्याने शेती करायची कशी, या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)