शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा विधिमंडळावर मोर्चा

By admin | Updated: December 4, 2015 01:21 IST

शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

८ डिसेंबरला आयोजन : जिल्ह्यातून कार्यकर्ते जाणारचंद्रपूर: शेतकऱ्यानना कर्जमाफी, दुष्काळग्रस्तांना मदत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.या मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी चंद्रपूर महानगर काँग्रेस कमेटीचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्यासह प्रदेश सचिव सुनिता लोढीया, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, केशव रामटेके, संजय रत्नपारखी, ज्योती कवठेवर आदींच्या उपस्थितीत गुरूवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना नंदू नागरकर म्हणाले, राज्यातील शेतकरी दुष्काळात भरडत असतानाही सरकारचे याकडे लक्ष नाही. चंद्रपूर जिल्याकतील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. धान, सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारी डोके वर काढत आहे. ओबीसी जनतेच्या आरक्षणाचा मुद्दा अद्यापही तसाच पडला आहे. सुनिता लोढीया म्हणाल्या, चंद्रपूर महानगर पालिकेतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. भरमसाठ करवाढ करून सर्वसामान्य चंद्रपूरकरांवर बोझा टाकला आहे. निविदा घोटाळाही ताजाच आहे. पिण्याचे पाणीही योग्यपणे मिळत नाही. राज्यात आणि चंद्रपूर शहरात भाजपाचेच शासन आहे. तरीही अन्यायच सुरू असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सर्वसामान्यांच्या आहारातील तूरडाळ २०० रूपये किलोवर गेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा वाढविण्याएवजी एलबीडी, पथकरनाके बंद करण्यात आले. त्याऐवजी नागरिकांवर अवाजवी करवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांच्या आणि गरिबांच्या योजना या सरकारने बंद पाडल्या. त्यातून पैसा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार करीत आहे. सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आवश्वासने पाळण्यात सरकार मागे पडले आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी ८ डिसेंबरच्या नागपुरातील मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात महिला काँंग्रेस, एनएसयूआय, युवक काँग्रेस, सेवादल यांच्यासह पक्षाच्या विविध आघाडींचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जिल्ह्यातून सहभागी होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)