शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीचा दोन बछड्यासह मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

सावरगाव मामा तलाव व बारबन देवस्थान परिसर : शेतकऱ्यांना दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील ...

सावरगाव मामा तलाव व बारबन देवस्थान परिसर : शेतकऱ्यांना दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील कन्हाळगाव मार्गालगत असलेल्या मामा तलाव व बारबन देवस्थान परिसरात पट्टेदार वाघिण तिच्या दोन बछड्यांसह वावरत आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना तिचे दर्शन झाल्याचे सांगितला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत व सावरगाव - कन्हाळगाव या मार्गाने वहिवाट करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सावरगाव परिसरातील अनेक गावांत शेतीचा हंगाम पूर्ण झाल्याने धान चुराई सुरु आहे. धान चुराई मशीन रात्री-बेरात्री शेतात येते त्याच वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उपस्थित राहवे लागते. कन्हाळगाव मार्गालगत असलेल्या येथील मामा तलाव व बारबन देवस्थान परिसरात सावरगाव येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहेत. मात्र सदर परिसरातअनेक शेतकऱ्यांना वाघिण तिच्या दोन पिल्लांसह आढळून आल्याने सावरगाव व कन्हाळगाव परिसरात भीती निर्माण झाली आहे. या परिसरात झुडपी जंगल व छोटासा टेकळीवजा भाग आहे. शिवाय रांजीचे झुडूप आणि खोल वाही आहे. येथे वाघिणीची नित्याची वहिवाट असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

मागील काही दिवसांपासून या परिसरात पट्टेदार वाघही अनेकांना दिसला.त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी सावरगाव -कन्हाळगाव मार्गाने ये -जा करने नागरिकांनी टाळले होते. मात्र आता वाघिनही या परिसरात मुक्त संचार करीत असल्याचेदहशत पसरली आहे. दरम्यान काही अनुचित घटना घडू नये. यासाठी खबरदारी म्हणून या बाबीकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष घालावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.