शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाव येथे चार घरे जळाली

By admin | Updated: March 23, 2017 00:33 IST

सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथे चार शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास घडली.

चार लाखांचे नुकसान : धान, जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य जळून खाक नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथे चार शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. अंतरगाव येथील शेतकरी कृष्णा देवाजी नागापूरे, बळीराम रामाजी नागापूरे, काशीनाथ रामाजी नागापूरे, रघुनाथ रामाजी नागापूरे यांची घरे लागून असून अचानक घराला आग लागली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने शार्ट सर्किट झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. काही नागरिकांनी गावातील विद्युत बंद केली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घराच्या वरच्या मजल्यावर बैलांचा चारा म्हणून कुटार भरलेले होते आणि दुसऱ्या बकारीमध्ये धान भरलेले होते. कुटाराने पेट घेतल्याने घराचे लाकुड फाटे पुर्णत: जळाले. आग विझविण्यासाठी मूल येथून अग्नीशमन दलाची गाडी बोलविण्यात आली आणि ११ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगतीत मोटार पंपाचे पाईप बचावले आणि धान्य अर्धवट जळाले तर उर्वरीत धान्य पाण्यामुळे खराब झाले. या घटनेत कृष्णा नागापूरे यांचे ३६ हजार रुपये, बळीराम नागापूरे यांचे दोन लाख १२ हजार रुपये, काशीनाथ नागापूरे ७० हजार तर रघुनाथ नागापूरे यांचे ७६ हजार रुपये असे एकूण तीन लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. घटनास्थळाला जि. प. सदस्य रमाकांत लोधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरकर, तहसीलदार भास्कर बांबोळे, नायब तहसीलदार रामचंद्र नैताम, मंडळ अधिकारी एस.जी. कन्नाके, तलाठी वाय.जे. सहारे, पोलीस पाटील सचिन शेंडे, सरपंच दुशीला बारसागडे व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. शार्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)