शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बालकाचे अपहरण करणाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: November 15, 2015 00:37 IST

नागभीड लगत असलेल्या तुकूम येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन तासानंतर त्याला गावातच आणून सोडणाऱ्या आरोपीला येथील...

कारण गुलदस्त्यात : तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणीनागभीड : नागभीड लगत असलेल्या तुकूम येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन तासानंतर त्याला गावातच आणून सोडणाऱ्या आरोपीला येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुकुम येथील मंथन चौधरी (७) आणि त्याचा चुलतभाऊ प्रथमेश (११) हे गावानजीकच्या राज्य महामार्गावर शौचविधीसाठी गेले असता डोंगरगाव (नागभीड) येथील गणेश पांडुरंग बोरकर (२५) या युवकाने मंथनला चल तुला गावात सोडून देतो, असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसविले व पळ काढला. प्रथमेशने ही गोष्ट गावात सांगितल्यानंतर गावकरी आरोपीच्या मागावरच होते.दरम्यान, तीन तासानंतर आरोपी गणेशने मंथनला गावच्या शाळेजवळ आणून सोडत असताना गावकऱ्यांनी त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. शनिवारी पोलिसांनी आरोपीला येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.अपहृत बालकाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण येथील वैद्यकीय तपासणी काहीच निष्पन्न न झाल्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)