शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दोन लाख लोकांपर्यंत पोहचला भोजनरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रपूरकरांनी मोठा संयम पाळत प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदी यशस्वी केली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना दिलासा : किशोर जोरगेवार यांचा कौतुकास्पद उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांना अनेक अचडणीचा सामना करावा लागत आहे. अशात गरजुंच्या मदतीसाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार समोर आले असून त्यांच्या यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संचारबंदीच्या काळात गरजुंसाठी भोजन वितरित केल्या जात आहे. दिवसाला जवळपास १२ ते १५ हजार गरजू लोकांपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांचा भोजनरथ पोहचत असून संचारबंदीपासून आजपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने जवळपास दोन लाख लोकांपर्यंत भोजन पोहचविण्यात आले आहे. त्यांची ही सेवा निरंतर सुरु असून यात समाजिक संस्थांचेही त्यांना योगदान लाभत आहे.संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीने हाहाकार माजविला आहे. जगासह भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात आहे. देशासह चंद्रपुरातही संचाबंदीचे पालन केल्या जात आहे. आज संचाबंदीचा १८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये चंद्रपूरकरांनी मोठा संयम पाळत प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदी यशस्वी केली आहे. असे असले तरी संचाबंदीच्या काळात सर्व उद्योग, नवनिर्मीतीचे काम बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांपुढे मोठया अडचणी निर्माण झाल्या आहे. अशात आमदार किशोर जोरगेवार यांनी संचारबंदीच्या पहिल्या दिवशीपासून गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.त्यांच्या वतीने शहर व ग्रामीण भागातील गरजुंसाठी भोजनसेवा सूरु करण्यात आली आहे. सुरुवातीला ३ ते ४ हजार गरजुंपासून सुरु झालेली ही भोजनसेवा आता वाढत्या गरजेनूसार विस्तारित करण्यात आली असून आजघडीला दिवसाला १२ ते १५ हजार गरजू लोकांपर्यंत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भोजन पोहचविले जात आहे. यात शहरातील विविध समाजिक संस्थांचे सहकार्यही आमदार जोरगेवार यांना मिळत आहे.शहरात सहा केंद्रप्रत्येक गरजूपर्यंत भोजन पोहचण्यासाठी स्वत: आ. जोरगेवार हे नियोजन करीत आहेत. भोजन वाटपासाठी शहरातील मुख्य भागांमध्ये सहा प्रमूख केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रावरुन प्रत्येक वार्डातील शाखा प्रमुखांकडे भोजन पाकीट दिल्या जात असून त्यांच्या मार्फत ते गरजुंपर्यत पोहचवले जात आहे.

टॅग्स :foodअन्न