शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीला पूर, दोन गावात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.), चिखलगाव गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक मार्ग बंद, गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्यामुळे अनेक शिवारात पाणी जमा झाले आहे. तालुक्यतील पिंपळगाव व चिखलगावात पुराचे पाणी शिरले आहे.तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.), चिखलगाव गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.पुराचा फटका नदी काठावर असलेल्या अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव(भो.), भालेश्वर, चिखलगाव, सोंद्री, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोळेगाव, खरकाडा, रणमोचन, पिंपळगाव(ख), चिचगाव, आवळगाव, हळदा शिवारातील पिकांना बसला आहे.सोबतच गांगलवाडी-आवळगाव या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे. नदीकाठावर असलेला पिंपळगाव(ख) या गावाचासुध्दा इतर गावांशी संपर्क तुटला असून गावाबाहेर जाणाऱ्या मार्गांवर पुराचे पाणी वाहत आहे.सतत वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे १९९४ च्या पुरासारखी स्थिती निर्माण होते की काय, अशी भीती नदीकाठाजवळ असलेल्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पुराचे पाणी शिवारात शिरल्याने खरीप हंगामातील धान व इतर पिके, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करण्याची मागणी आहे.लाडजवासीयांचा संपर्क तुटलावैनगंगा नदी तुडुंब भरून दुथडी वाहत असल्याने पुलाअभावी लाडजवासीयांचा मागील कित्येक दिवसांपासून तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे गाव वैनगंगा नदीपत्राच्या मधोमध वसलेले असून चारही बाजूंनी नदीपात्राने व्यापलेले असल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.गंगालवाडी-ब्रम्हपुरी मार्ग बंदगांगलवाडी : या भागात सतत चार दिवस पाऊस झाल्यामुळे गांगलवाडी ते ब्रम्हपुरी मार्गात असलेल्या नाल्याला पूर आला आहे. त्याचे पाणी पुलावरून वाहायला लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असून हा मार्ग बंद झाला आहे. तसेच या भागातील बऱ्याच शेतकºयांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूर