जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:05+5:302021-02-05T07:39:05+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या २३ हजार ८५ वर ...

Five corona positives were found in the district | जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळले

जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळले

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या २३ हजार ८५ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५६७ झाली आहे. सध्या १२६ बाधितांवर उपचार सुरू आहे. २ लाख एक हजार २५५ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी १ लाख ७६ हजार २५४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील दोन, ब्रम्हपुरी दोन व नागभीड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Five corona positives were found in the district