पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसायपूरक उद्योग

By Admin | Updated: July 8, 2017 00:42 IST2017-07-08T00:42:33+5:302017-07-08T00:42:33+5:30

मत्स्य उद्योगासाठी पूर्व विदर्भात भरपूर संधी असून विविध उपक्रम व नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य उद्योगाला गती देणे आवश्यक आहे.

Fisheries Industry for Farmers of Vidarbha East | पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसायपूरक उद्योग

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसायपूरक उद्योग

विभागीय आयुक्त : सिंदेवाही येथे शेतकरी मेळावा
चंद्रपूर : मत्स्य उद्योगासाठी पूर्व विदर्भात भरपूर संधी असून विविध उपक्रम व नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य उद्योगाला गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
सिंदेवाही येथे मत्स्य व्यवसायिक, त्यांचे प्रशिक्षक, शेतकरी यांच्या मेळाव्यात मत्स्य व्यवसायासंदर्भात अनुपकुमार यांनी स्वत: सादरीकरण केले. शेतकऱ्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी मत्स्यव्यवसाय संदर्भात अभियानाची गरज, त्याचे फायदे, शासकीय योजना, बाजारपेठ आणि या भागातील वैशिष्ट यांचा उहापोह केला. या भागात प्रशिक्षण देणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचा व यशस्वी शेतकऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी पूर्व विदर्भाला मत्स व्यवसायात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करायचे असून त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम, माणिक घोडमारे, रमाकांत लोधे, पंचायत समिती सभापती मधुकर मडावी, उपसभापती मंदा बाळबुध्दे, नगराध्यक्ष मोहीनी गेडाम, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार रोशन मकवाणे, गटविकास अधिकारी अशोक इल्लुरवार व पोलीस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Fisheries Industry for Farmers of Vidarbha East