महाआवास अभियानामध्ये भद्रावती पंचायत समिती जिल्ह्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST2021-08-22T04:31:08+5:302021-08-22T04:31:08+5:30

भद्रावती : महाआवास अभियान (ग्रामीण)मध्ये पंचायत समिती भद्रावती अव्वल आली असून, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे महाआवास अभियान (ग्रामीण) जिल्हास्तरीय ...

First from Bhadravati Panchayat Samiti district in Mahawas Abhiyan | महाआवास अभियानामध्ये भद्रावती पंचायत समिती जिल्ह्यातून प्रथम

महाआवास अभियानामध्ये भद्रावती पंचायत समिती जिल्ह्यातून प्रथम

भद्रावती : महाआवास अभियान (ग्रामीण)मध्ये पंचायत समिती भद्रावती अव्वल आली असून, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे महाआवास अभियान (ग्रामीण) जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये पंचायत समिती भद्रावतीला पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक पंचायत समिती सदस्यांना मिळाला. राज्य पुरस्कृत आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक पंचायत समिती भद्रावतीला मिळाला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट पोस्टर म्हणून तृतीय क्रमांक चंदनखेडा-मुधोली या प्रभागात प्राप्त झाला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत मोहबाळाला मिळाला.

वरील सर्व पुरस्कार पंचायत समिती भद्रावतीचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे व गटविकास अधिकारी डॉक्टर मंगेश आरेवार, तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता राकेश तुरारे व मिलिंद नागदेवते यांनी स्वीकारले.

Web Title: First from Bhadravati Panchayat Samiti district in Mahawas Abhiyan