शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या किचनमध्येही अग्निशमन यंत्रणा

By admin | Updated: March 11, 2015 01:01 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर दिसत आहे. शाळांमधील पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये व संगणक कक्षाचे फायर आॅडीट करण्यात येणार आहे.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर दिसत आहे. शाळांमधील पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये व संगणक कक्षाचे फायर आॅडीट करण्यात येणार आहे. या ठिकाणीही आता अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाला आग लागल्यानंतर शासकीय यंत्रणा अलर्ट झाली होती. राज्यभरातील इमारतींचे व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयांचे फायर आॅडीट करण्याच्या सूचना शासनाने संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांना दिल्या होत्या. मात्र ही कार्यवाही कालांतराने कागदोपत्रीच गुंडाळून राहिली. त्यामुळे आगीसारख्या घटना घडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार अनेकदा घडला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शालेय पोषण आहार देण्याची योजना अमलात आली. हा आहार शाळांमध्ये शिजविला जातो. याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांमधून संगणकाचे शिक्षण देणे सुरू झाले. शालेय पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये केव्हाही आगीसारखी घटना घडू शकते. शिवाय संगणक कक्षात विजेचा वापर असल्याने शार्ट सर्कीटसारखी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही या ठिकाणी आजपर्यंत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आलेली नाही. आता मात्र शिक्षण विभागाने हा दोष दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील किचनमध्ये व संगणक कक्षात अग्निशमन यंत्र बसविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळांना तीन अग्निशमन यंत्र याप्रमाणे तालुका पातळीवर याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी सवितरण अधिकारी म्हणून शिक्षण संचालक (प्राथमिक) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)