शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांवर ओढवले आर्थिक संकट

By admin | Updated: May 8, 2015 01:11 IST

कोरपना तालुक्यात आजमितीला चार सिमेंट कंपन्या आहेत. या कंपन्यांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या.

रत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यात आजमितीला चार सिमेंट कंपन्या आहेत. या कंपन्यांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. यामागे नोकरीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याप्रमाणे या सिमेंट कंपन्यांनी नोकऱ्याही दिल्या. यातील तीन सिमेंट कंपन्यांचे उत्पादन सुरळीत सुरू आहे. परंतु मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीचे उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातील बहुतांशी कामगार परप्रांतीय आणि बाहेरचे असले तरी ज्यांच्या जमिनी गेल्या अशाही कामगारांची संख्या अधिक आहे. कंपनीत काम व वेतन मिळत नसल्याने आता आम्ही नक्षलवादी बनायचे काय, असा सवाल कामगार लोकप्रतिनिधींना विचारत आहे. नोकरी मिळेल, या आशेत लाखो रुपये किमतीच्या पिकावू शेतजमिनी कंपन्यांच्या घशात गेल्या आणि आता काम व दामही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतजमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा, ती जमीन मालकीची राहिलेली नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या शेतकरी मुलांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना देताना नोकरी, शेतीचा मोबदला, मुलभूत सुविधा आदींचा अंतर्भाव करून आश्वासने दिली गेली. परंतु आता कंपनी प्रशासन ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचे चित्र मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत दिसून येत आहे. कंपनीत स्थायी नोकरी मिळाल्याने अनेकांनी विवाह उरकून टाकले. म्हाताऱ्या माय-बापांनाही शेती गेली. पण नोकरी मिळायचा दिलासा वाटला. परंतु काम मिळत नसल्याने कामगारांच्या घरी चिंतेचे वातावरण पसरले आहे. हाती पैसाच नसल्याने यातील काही कामगारांनी नातलगांच्या लग्न समारंभाला जाण्याचेही टाळले असल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना लोकप्रतिनिधी उद्योजकांना साथ देतात. मात्र त्याच शेतकऱ्यांच्या मुलांवर बेरोजगारीचे सावट आ वासून उभे असताना ‘ब्र’शब्दही काढत नाही. वास्तविक मुर्ली अ‍ॅग्रो कंपनीने कामगारांच्या हितासाठी काही उपक्रम राबविणे आवश्यक आहे. मात्र कामगारांच्या आयुष्यात निवासी घरे, पाणी, शाळा, आरोग्य व दत्तक गावांमध्येही मुलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. कंपनीचे याकडे लक्ष नाही. परंतु याकडेही कंपनी प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरड कामगार करीत आहे. यापूर्वी शेती असल्याने किमान खायचे धान्य घरी भरून राहायचे तर नगदी पिके विकून पैसा मिळत होता. मात्र आता वेतनच मिळत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. गावातील दुकानदार, व्यापाऱ्यांनाही याबाबत माहिती असल्याने तोही माल देण्यास टाळाटाळ करीत आहे.