शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

सहा घटकातील मजुरांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

मध्यचांदा वनविभागात बल्लारशा, राजुरा, विरूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, वनसडी व जिवती वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात एकूण २२ तेंदू घटक आहे. त्यापैकी यावर्षी कंत्राटदारानी १७ तेंदू धटक खरेदी केले आहे. यामुळे येथील मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याचे कामे मिळणार असून त्यापोटी मिळणाºया मजुरीमुळे आर्थिक सहाय्य होणार आहे.

ठळक मुद्दे२२ पैकी १७ घटकांचीच विक्री : वर्षभराची पुंजी जाण्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्यचांदा वनविभाग चंद्रपूरमधील २२ तेंदू घटकांपैकी यंदा १७ घटकांची विक्री झाली आहे. उर्वरित सहा तेंदूघटक विक्री न झाल्यामुळे त्या परिसरातील गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याच्या कामाअभावी मिळणाऱ्या मजुरीअभावी मुकावे लागणार आहे.मध्यचांदा वनविभागात बल्लारशा, राजुरा, विरूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, वनसडी व जिवती वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात एकूण २२ तेंदू घटक आहे. त्यापैकी यावर्षी कंत्राटदारानी १७ तेंदू धटक खरेदी केले आहे. यामुळे येथील मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याचे कामे मिळणार असून त्यापोटी मिळणाºया मजुरीमुळे आर्थिक सहाय्य होणार आहे. तेंदूपाने गोळा करण्याचे कार्य फक्त १५ दिवसाचे असून या कालावधीत प्रत्येक कुटुंबातील सदस्य तेंदूपाने गोळा करण्याचे कार्य करतात.तेंदूपत्ता घटक विक्री न झालेले बेंबाळ, बल्लारशा, पळसगाव, विरूर, वनसडी व जिवती या तेंदू घटकातील मजुरांना मजुरीपासून वंचित होणार आहे. मजुरीपोटी कंत्राटदाराकडून नगदी रक्कम मिळत असून प्रत्येक कुटुंबास मजुरीपोटी हजारो रूपये मिळतात. हीच त्याची वर्षभराची पुंजी असते. त्यामुळे या कामासाठी आम जनता आतूरतेने वाट पाहत राहतात.सहा तेंदू घटक विक्री न झाल्यामुळे तेथील इच्छूक मजुरांना आर्थिक फटका बसणार आहे. अगोदरच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कामाअभाावी आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात पुन्हा तेंदू घटक विक्री न झाल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्याचा परिणाम आर्थिक स्थिती पुन्हा खालावण्याची पाळी आली आहे. या वन विभागाातील तेंदूपाने घटकाच्या विक्रीमुळे शासनास व मजुरांना कोट्यवधी रूपये मिळतात. वन विभागास मिळणाºया रकमेतून खर्च काढून जवळपास ७० टक्के रक्कम पाने गोळा करणााºया मजुरांना बोनस पोटी मिळतात. त्यामुळे विक्री न झालेल्या घटकातील हजारो मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याची रक्कम व बोनस रकमेपासून वंचित होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग