आपद्ग्रस्ताला सहकारी बँकेकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST2021-07-10T04:19:52+5:302021-07-10T04:19:52+5:30

सिंदेवाही : आगीमुळे संपूर्ण घर भस्मसात झालेल्या कुटुंबांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सिंदेवाहीच्या वतीने आर्थिक मदत देण्यात ...

Financial assistance from a co-operative bank to the disaster victim | आपद्ग्रस्ताला सहकारी बँकेकडून आर्थिक मदत

आपद्ग्रस्ताला सहकारी बँकेकडून आर्थिक मदत

सिंदेवाही : आगीमुळे संपूर्ण घर भस्मसात झालेल्या कुटुंबांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सिंदेवाहीच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

स्थानिक राम मंदिर चौकातील रहिवासी देवराव बाळूजी ठाकरे व संजय बाळूजी ठाकरे यांचे घर आगीत बेचिराख झाले होते. दोन्ही कुटुंबांना मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवतळे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, शहर नगर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, शाखा व्यवस्थापक नीलकंठराव लेंझे उपस्थित होते.

090721\img-20210709-wa0042.jpg

सहकारी बँकेकडून आर्थिक मदत

Web Title: Financial assistance from a co-operative bank to the disaster victim