शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरातील ३१५ कुटुंबातील लोकांचा जीवघेणा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रूग्ण निघाल्याचा परिणाम : ९० टक्के मजुरांचे हाल

सुभाष भटवलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : जिल्ह्यातील विसापूर गावात २१ मे रोजी एक २६ वर्षाचा तरूण कोरोनाबाधित आला. यामुळे विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. या क्षेत्रातील ९० टक्के मजूर वर्ग असून दररोज मिळणाऱ्या मिळकतीवर उदरनिर्वाह करतात. या भागात कोरोनाबाधित रूग्ण निघाल्याचा विपरित परिणाम झाला. विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ३१५ कुटुंबातील ११५० लोकांचा जीवघेणा संघर्ष सुरू झाला आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला. कोरोनाबाधित तरूणाच्या कुटुंबातील सदस्य व अन्य एक कुटुंबातील सदस्यासह १३ जणांना चंद्रपूर येथे विलगीकरण करण्यासाठी हलविण्यात आले. यामुळे या भागातील नागरिकांवर उपासमारीचे जबरदस्त संकट ओढवले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनाश्यक वस्तु मिळण्याचे नाममात्र दोन दुकाने असून तेदेखील बंद आहेत़ गावात इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी ३१५ कुटुंबातील ११५० सदस्यांना जीवघेण्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ कोरोना संकटामुळे ओढवली आहे ़ लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात काहिसा मोकळा श्वास घेणाºया नागरिकांना चवथ्या टप्प्यातील टाळेबंदीच्या काळात मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे ़विसापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कोरोनाबाधित रूग्ण आल्याने व या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व सीमाबंदी केल्यामुळे येथील ९० टक्के रोजंदारी मजुरांची जीवन जगण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे.कोरोना संकटापेक्षा उपासमारीने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर प्रशासन आजघडीला कोरोना संकट हाताळण्यावर भर देत असले तरी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे़ भयभीत नागरिकांना उदरनिर्वाहासाठी साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी विसापूर येथील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या