शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:25+5:30

ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Farmers will not be healthy without worry | शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । चंद्रपूर व ब्रह्मपुरीत पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर/ब्रह्मपुरी : १७ जानेवारीला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे पत्र मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांकडे आले असल्याचे सांगून माझ्या मागणीनुसारच शेतकऱ्यांना धानाला २५०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस मिळाला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
विजय वडेट्टीवार हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे आले. यावेळी त्यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करून नागरी सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर येथील कार्यक्रम गांधी चौकात घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, सुनिता लोढिया, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता सतीश वरजुरकर, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आदी उपस्थित होते.
ब्रह्मपुरी येथील कार्यक्रम पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सहसराम कोरेट्टी, गुडू अवस्थी, प्रकाश देवतळे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, गोविंद भेंडारकर, देविदास जगनाडे आदी उपस्थित होते.

शेतमालावर आधारित उद्योग आणणार
ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या धर्तीवर कृषीशी संबंधित शिक्षणाच्या सोयीसाठी कृषी विज्ञान केंद्र उभारण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Farmers will not be healthy without worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.