शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकवळपेठ परिसरात वाघाची दहशत । तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत चिचाळा कवळपेठ गट ग्रामपंचायत परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून वाघाची दहशत सुरू आहे. वाघाने हल्ला केल्याने आठ दिवसात दोन जनावरे ठार तर एक व्यक्ती जखमी झाला. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घातला.चिचाळा व कवळपेठ येथील शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. काही दिवसात रोवणीलाही सुरूवात होईल. शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे अडचणी आल्याने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य प्रशांत गट्टुवार यांच्या नेतृत्वात नागेश टिकले, संजय धोडरे, वासुदेव बरांडे, सुभाष वाढई आदींनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.शेतीभोवती तारांचे कुंपण घालणारचिचाळा-कवळपेठ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले. या भागातील ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्या शेती भोवताल तारा अथवा जाळीचे कुंपण लावण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांनी ‘लोकमत‘ला दिली.तलावात परिसरात दोन शेळ्या ठारसावरगाव : येथील मामा तलाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात माधव पेंदाम व चक्रधर खटू निकुरे या शेतकºयांच्या दोन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरूवारी घडली. या परिसरात वाघाचा संचार सुरू असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वाघाच्या हल्ल्यात गाय ठारमासळ : वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चैती रिठ (टेकाडी मांडवझरी) संरक्षित वनपरिक्षेत्र परिसरात मंगळवारी दुपारी घडली. कोलारा येथील शेतकरी आनंदराव नन्नावरे हे गुरूवारी सकाळी ८ वाजता शेताकडे जात असताना वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु समयसुचकतेने शेतकरी बचावले. कोलारा येथील गुराखी वसंता ढोणे हे ताडोबा लगतच्या जगंलालगत गुरे चारण्यासाठी गेले होते. वाघाने गुरांच्या कळपावर केल्याने गाय ठार झाली. शंकर ढोणे व वसंता जांभूळे यांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळाला. घटनेची माहिती कोलारा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना दिल्यानंतर पंचनामा केला. सातारा येथील अक्षय माळवे यांना भरपाई देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग