शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

रात्री उशिरापर्यंत चालतो व्यवसाय चंद्रपूर : शहरातील तुकूम, रामनगर परिसरामध्ये काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ...

रात्री उशिरापर्यंत

चालतो व्यवसाय

चंद्रपूर : शहरातील तुकूम, रामनगर परिसरामध्ये काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. छोट्या व्यावसायिकांनी दुकान बंद करण्यासाठी थोडा उशिर केला तरी दंड आकारला जातो. मात्र मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे.

ट्रॅव्हल्समुळे

अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबना

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवाशी निवाºयाजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

कर्मचारी

पदोन्नतीपासून वंचित

चंद्रपूर : जिल्ह्यात सात विभागामध्ये कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. तर दुसरीकडे कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

स्वच्छता करण्याची मागणी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकामुळे तालुक्यात योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली.

मोकाट जनावरांचा

चौकाचौकात ठिय्या

वरोरा : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

बस सुरु करण्याची मागणी

चंद्रपूर : मूल-पोंभूर्णा-गोंडपिपरी ही प्रवासी बस सेवा दुपारी ४ ते ५ या वेळेत सुरु करण्याची मागणी केली जात आहे. दोन्ही तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी या ठिकाणचा नेहमी संबंध येतो. याकडे महामंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

डोंगरगाव रस्त्याची दैनावस्था

वरोरा : वरोरा मार्गावरील डोंगरगाव, दहेगाव ते निमसडा पाटीपर्यंत रस्त्याचे दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहे. त्यामुळे त्या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यामुळे वाहन चालकाचा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी चिकणी, बोपापूर, डोंगरगाव, दहेगाव, मोहबाळा येथील नागरिकांनी केली.