शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: November 15, 2015 00:45 IST

कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.

कोरपना : कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला. परंतु, शासनाला आतापर्यंत मुहुर्तच सापडला नसल्याचे दिसते. कापूस कुठपर्यंत घरीच ठेवायचा, या चिंतेत शेतकरी आहेत. याचा फायदा घेत तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत.कापूस खरेदीबाबत शासन उदासीन असल्याने दिसते. त्यामुळे येथे अद्याप कापूस संकलन केंद्र सुरू झाले नाही. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जास्त प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. पावसाने यावर्षी सुरूवातीला शेतकऱ्यांना झोडपले, त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका शेतपिकांना बसला. कोरड्या दुष्काळाने शेतपिकांची पुरती वाट लागली. शेती पिकली नाही तर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. कसेतरी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पीक भरीस आल्यावर रोग पडल्याने कपाशीची झाडे वाळायला लागली होती. यावर उपाययोजना करीत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी केली. एवढा आर्थिक भुर्दंड सोसून पीक आता हाती आले, तर विक्रीची चिंता त्यांना लागली. शासनाचे खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.खासगी व्यापारी बेभाव कापसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.शासनाने हमीभाव जाहीर केला. हा हमीभाव तोकडा आहे. शासन कापूस दरवाढीसंदर्भात विचार करून जास्त भाव जाहीर करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शासनाने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. उलट कापूस संकलन केंद्रही सुरू केले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावात घेण्याची संधी मिळाली आहे. आंध्रातील व्यापारी या संधीचा फायदा उचलण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते कापूस खरेदी करीत आहेत. दारातच कापूस विकला जात असल्यामुळे कमी भावात द्यावा लागत आहे. खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. आता मालाची खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. त्यासाठी तेलंगणाचे व्यापारी येथे येत आहेत. (शहर प्रतिनिधी)