शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या अल्प दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले.

ठळक मुद्देमळणीला वेग : शासकीय मदतीची आता प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने विश्रांती घेतली असून सोयाबीनच्या मळणीला वेग आला आहे. ढगाळी वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती आहे. या पावसामुळे सोयाबीनलाही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले. मध्यंतरी झालेल्या पावसाने सोयाबीनला फटका बसला होता. ऐन काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते विक्रीसाठी तयार केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. सद्या व्यापाऱ्याकडून दोन हजार २०० रुपये ते तीन हजार रुपये दर दिल्या जात आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून विविध कारणे सांगून कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात घटजिल्ह्यात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. सद्यस्थितीत बाजारपेठेत अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत आहे. परतीच्या पावसात भिजल्याने सोयाबीनमध्ये असलेल्या ओलाव्याने दर कमी झाल्याचे कारण सांगितले जात असून त्यापेक्षाही कमी दरात खरेदी सुरू आहे. शिवाय वजनातही घट होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत काही व्यापारीही भाव पाडून शेतकऱ्याची पिळवणूक करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती