शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2017 00:27 IST

पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे.

दुबार पेरणीचे संकट : बा पावसा का कोपलास ?लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे. परंतु पाऊस शेतकऱ्यांना हुलकावणी देत निघून जात आहे. आज-उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांना ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पाहिलेले स्वप्न मातीमोल झाले असून पावसाअभावी पेरण्या हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे त्याच्या काळजाची धडधड वाढायला लागली असून अनेकांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.कृषीप्रधान देशातील शेती आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकऱ्यांनी जगावे की मरावे एवढी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचे दिवस आज संपले आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतो आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुऱ्या पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे.आता शेतकऱ्यांजवळ पुन्हा पेरणी करण्यासाठी एक छदामही पैसा शिल्लक उरलेला नाही. शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना आतून पोखरतो आहे. पावसाअभावी शिवार अजूनही हिरवेगार झाले नाही. जुलै महिन्याचा आठवडा संपून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस शेतकऱ्यांवर का रूसून बसला, हे कळायला मार्ग नाही. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबविली आहे. पावसाअभावी जगाचा पोशिंदाच चिंतातूर झाला असून त्याच्या काळजाची धडधड वाढली आहे.बहुतांश शेती कोरडवाहूजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. निसर्गाचे पाणी हेच शेतीचे जीवनामृत आहे. परंतु निसर्ग आज लहरीपणासारखा वागायला लागल्याने निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती बिनभरवशाची झाली आहे.काहींच्या अद्याप पेरण्याच नाहीयंदा खरीप हंगामात एकूण चार लाख ३८ हजार २०२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात येईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या टाकल्या आहेत. जवळजवळ निम्म्या शेतकऱ्यांनी अद्यापही पेरण्या केलेल्या नाही. पाऊस प्रत्येक नक्षत्रात दगा देत असल्याने शेतकऱ्यांनी हिंमत खचत चालली आहे. ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांच्या पेरण्या पावसाअभावी नष्ट होत आहे.