अखेर जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:36+5:30

स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांनी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित का झाली नाही, असा प्रश्न विचारला असता तयारी सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले.

Eventually district level sports meet canceled | अखेर जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन रद्द

अखेर जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन रद्द

Next
ठळक मुद्देजि. प. शिक्षण समितीचा ठराव : स्वयंअध्ययन सराव पुस्तिका अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी पहिल्या वर्गाला अत्यंत महत्त्व असल्याने पुढील सत्रापासून स्वयंअध्ययन सराव पुस्तिका अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जि. प. परिषद शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी तयार केलेले प्रेरणादायी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप काही सदस्यांनी केल्यावर त्याबाबत चर्चा झाली. विलंब झाल्याने यंदाचे जिल्हास्तरीय संमेलन अखेर रद्द करण्याचा ठरावही पारित करण्यात आला.
जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती रेखा कारेकर यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक पार पडली.
या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला. शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढत असल्याने जि. प. शाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या बालकांचा पाया कच्चा असेल तर पुढील शिक्षणात टिकणे कठीण होईल, या हेतूने सभापती रेखा कारेकर यांनी उपस्थित शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
त्यावेळी स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांनी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित का झाली नाही, असा प्रश्न विचारला असता तयारी सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले. शालेय पोषण आहार, भरारी पथक, मद्यपी शिक्षकांवरील कारवाई विषयांवरही चर्चा झाली. यावेळी सदस्य रणजित सोयाम, गोपाल दडमल, मेघा नलगे, कल्पना पेचे, योगिता डबले, तज्ज्ञ सदस्य जे. डी. पोटे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) मोहन पवार व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Eventually district level sports meet canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.