शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन प्रक्रिया होण्यापूर्वीच सातबारावर फेरफार

By admin | Updated: July 13, 2017 00:44 IST

वेकोलिने २५ वर्षांपूर्वी एसीसी कारखान्याच्या वसाहतीकरिता उसगाव क्षेत्रातील १९ शेतकऱ्यांच्या ३८ हे. आर. शेतजमीनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली.

महसुल विभागाचा प्रताप : वेकोलिची प्रक्रिया २५ वर्षांपासून प्रलंबितलोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलिने २५ वर्षांपूर्वी एसीसी कारखान्याच्या वसाहतीकरिता उसगाव क्षेत्रातील १९ शेतकऱ्यांच्या ३८ हे. आर. शेतजमीनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. ती भूसंपादन प्रक्रिया १९९२ नंतर प्रलंबित होती. मात्र पाच महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणतीही सुचना न देता महसूल विभागाने एसीसी कंपनीच्या नावाने सातबारा केला. दोन महिन्यांपूर्वी शेतकरी सातबारा करिता तलाठी कार्यालयात गेले, तेव्हा हा घोळ लक्षात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकाराबाबत एसीसी कंपनीही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाकरिता व एसीसी कारखान्याच्या कामगार वसाहतीचे पुनर्वसनासाठी कारखान्याला लागून असलेल्या उसगाव शेत शिवारातील १९ शेतकऱ्यांपैकी एकूण ३८ हेक्टर ६५ आर शेतजमीन भूसंपादनाची प्रक्रिया १९९२ मध्ये प्रक्रिया सुरू केली. टीआरएलकडून मोजमाप झाले. दरम्यान सदर जमीन क्वार्टर बांधकाम करिता योग्य नाही, असा निकर्ष निघाल्याने एसीसीने जमिन नाकारली. तेव्हापासून भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित होती.शासनाने तीन वर्षापूर्वी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये या प्रकरणाचा अंतर्भाव होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित केसेस असल्याने विविध तालुक्यातील एसडीओकडे प्रकरण वर्ग केले होते. त्यात हे प्रलंबित प्रकरण चिमूर एसडीओकडे गेले आणि शासनाने दिलेल्या अवधीच्या आत प्रलंबित केसेस निकाली काढण्याच्या घाईत एसडीओंनी एसीसीच्या नावाने सातबारा करण्याचे आदेश तलाठी यांना दिले. मात्र भूसंपादन प्रक्रिया वेकोलिकडून १९९२ मध्ये सुरू झाली. शेतजमिनीचे मोजमाप झाल्यानंतर प्रक्रिया थांबली होती. मात्र सातबारा कंपनीच्या नावे करण्यात आला. पालकमंत्र्यांनी घेतली दखलया गंभीर प्रकरणाकडे जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी महसूल विभागाकडून झालेल्या प्रकाराबाबत पालकमंत्री मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व आ. शामकुळे यांचे लक्ष वेधले. त्यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा मिळावा अशी मागणी केली. त्यामुळे सातबारावरील एसीसीचे नाव काढून ‘त्या’ १९ शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा पुर्ववत झाला आहे.