शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा येथे अंनिसचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

By admin | Updated: April 7, 2016 00:43 IST

गट ग्रामपंचायत देवाडा आणि दिपशिखा महिला बचत गट, ग्राम महासंघ देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...

चंद्रपूर : गट ग्रामपंचायत देवाडा आणि दिपशिखा महिला बचत गट, ग्राम महासंघ देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये महाराष्ट्र अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव यांचा जादूटोणाविरोधी कायदा व तथाकथित चमत्कारामागील बूवाबाजी या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. देवाडाचे सरपंच कमलाकर येडमे, उपसरपंच अरविंद उपरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाराव झाडे, माजी अध्यक्ष दौलत देठे, चोराळाचे माजी सरपंच प्रमिला बोरकर, सिदूरचे सरपंच नंदा कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जाधव यांनी जादूटोणाविरोधी कायदा व सापाबद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती आणि चमत्कारामागील बुवाबाजी याबद्दलची सविस्तर माहिती सचित्र पोस्टर्स्च्या सहाय्याने समजावून सांगितली. विज्ञान तंत्र व हातचलाखी यावर आधारित दाखविले जाणारे तथाकथित चमत्कार दैवीशक्तीमुळेच होतात, असे भासवून ढोंगी लोक जनतेला कसे फसवितात, याबद्दलची माहिती देऊन तशाच प्रकारे पाण्याने दिवा पेटविणे, खिळ्यांच्या टोकावर उभे राहणे, हवेतून वस्तू काढणे, मंत्राने रिक्त कलशातून तीर्थ काढणे, मांत्रिक पट्टा इत्यादी चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण केले. यावेळी चमत्कारामागील गैरसमज, बुवाबाजी दूर करण्याकरिता प्रत्येक चमत्कारामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी उपस्थितांना स्पष्ट करून सांगितले.जादूटोणा, भूत, भानामती, करणी, दैवी चमत्कार यांचे जगामध्ये अस्तित्वच नाही. ढोंगी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी समाजामध्ये पेरलेल्या या अफवा आहेत. त्यावर विश्वास न ठेवता संत व समाज सुधारक यांचे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विज्ञानवादी विवेकी विचार आत्मसात करून देशहितासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात समितीला सहकार्य करण्याचे आवाहन जाधव यांनी याप्रसंगी केले. सरपंच येडमे यांच्या हस्ते पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बचत गटांचे जिल्हा समन्वयक राजेश पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)