चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरणावरही भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:30+5:302021-05-06T04:30:30+5:30

यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी, देवराव भोंगळे, ...

Emphasis should also be placed on vaccination by increasing the number of tests | चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरणावरही भर द्यावा

चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरणावरही भर द्यावा

Next

यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. कोविड रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले. त्यामुळे बेडस्‌ची संख्या वाढवावी. काही ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर रिपोर्टला विलंब होत आहे. निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हे कळायला पाच दिवस लागत आहेत. तोपर्यंत इतरांना कोरोनाचा संसर्ग होतो. टोल फ्री नंबरच्या माध्यमातून बेडची माहिती उपलब्ध करावी, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी कॉल सेंटर सुरू करावे, भविष्यातील संकटासाठी सर्व सभागृहे, हॉटेल्स व सार्वजनिक समाजमंदिरांची यादी तयार करावी, आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी खनिज विकास निधी द्यावा, यासह विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली.

सात आरोग्य केंद्रांत रुग्णवाहिका नाही

जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ५८ ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. उर्वरित सात केंद्रांत रुग्णवाहिका उपलब्ध करून काही जुन्या रुग्णवाहिकांची दुरुस्तीही करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या सूचना महत्त्वपूर्ण आहेत. त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.

Web Title: Emphasis should also be placed on vaccination by increasing the number of tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.