शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची रणधुमाळी

By admin | Updated: April 7, 2016 00:42 IST

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक १७ एप्रिलला होत आहे.

६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : १७ एप्रिलला होणार निवडणूकबल्लारपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक १७ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत एकूण १८ जागेसाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या बाजार समितीवर ताबा मिळविण्यासाठी दोन आघाड्यात सत्ता संघर्ष निर्माण झाला असून सहकारी संस्था मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विजयासाठी उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे.चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघात सर्वाधिक ११ जागा असून २४ उमेदवारांनी निवडणुकीत दंड थोपटले आहे. येथे पुरुष गटातील ९ जागेसाठी १८ तर महिला राखीव गटातील दोन जागेसाठी चार महिला उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये बाजार समितीचे उपसभापती गंगाधर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश चोखारे, गोविंदा पोडे, विद्यमान संचालक अलका वाढई, विजय टोंगे यांच्यासह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतांची आर्जव करीत आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघात दिग्गजांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे चुरस वाढणार आहे.ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागेसाठी नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. येथे सर्वसाधारण गटातील दोन जागेसाठी सहा, अनुसूचित जाती/जमाती गटात एका जागेसाठी तीन तर आर्थिक दुर्बल गटातील एका जागेसाठी दोन उमेदवारात लढत होत आहे. व्यापारी/अडते मतदार संघातील दोन जागेसाठी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. हमाल व मापारी मतदार संघातून एका जागेवर दोन उमेदवार एकमेकांना आव्हान देत आहेत. या मतदार संघात केवळ ६५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सहकारी संस्था मतदार संघातील महिला राखीव गटातील दोन जागेसाठी शोभा वरारकर, अल्का वाढई, मालन आयलनवार व वत्सला ताजने यांच्यात लढत होत असून एकमेकींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतर मागास प्रवर्ग गटातील एका जागेवर नीरज बोंडे व श्रीकृष्ण धोडरे यांच्यात सरळ लढत होत आहे. सहकारी संस्था मतदार संघातीेल विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातील एका जागेसाठी शीला मेकलवार, प्रकाश पचारे व संजय सिंगम यांच्यापैकी एकावर मतदार शिक्कामोर्तब करणार आहेत. चंद्रपूर बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक प्रमुख दोन आघाड्यात लढली जात असून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीत मतदारांना पसंतीच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटासाठी पांढरा, महिला राखीव गटासाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी निळा तर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी पिवळ्या रंगात मतपत्रिका राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)