शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पंचायत समितीत एकता दिवस

By admin | Updated: November 1, 2015 01:15 IST

भारताच्या माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात...

मान्यवरांचे मार्गदर्शन : कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथबल्लारपूर : भारताच्या माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, लक्ष्मी कुमरे, सुवर्णा जोशी, कनिष्ठ अभियंता प्रकाश शेंडे, राजेश गाडगे, अभियंता रमेश श्रीवास्तव, सुशील गुंडावार, प्रदीप तांडुरवार यांची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना अ‍ॅड. हरीश गेडाम म्हणाले, भारताचे माजी गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. स्थानिकांचे विलिनीकरण करून लोकशाही व्यवस्थेला बळकट केले. त्याचप्रमाणे स्व. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या बळावर देशाला नवी दिशा दिली. देशाची एकता, अखंडता व सुरक्षा राखण्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देश प्रगतीकडे वाटचाल करू लागला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या राजकारणी मंडळींना नवी दिशा देणारी ठरली आहे, असे त्यांनी मनोगतातून सांगितले. अनेकश्वर मेश्राम, बी.बी. गजभे यांनीही स्व.सरदार वल्लभभाई पटेल व माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आदरांजली अर्पण केली. संचालन लक्ष्मी कुमरे यांनी तर आभार सुनील नुत्तलवार यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)विकासाकडे दुर्लक्षखांबाडा : येथील ग्राम पंचायत सदस्यांच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ गाळ साचला आहेत. नाल्यामध्ये जंतु व अळ्या पडल्या आहेत. खांबाडा-बोपापूर या मुख्य रस्त्यावर नळाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)