पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:23+5:30

तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशनच्या पेन्शनर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होेत्या. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, उद्घाटक म्हणून तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याध्यापक ना. गो. थुटे, प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार गोसावी म्हणाले, मीसुद्धा पेन्शनर्स शिक्षकाचा मुलगा आहे.

Efforts to solve pensioners' problems | पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देधानोरकर : वरोरा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यांच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले.
तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशनच्या पेन्शनर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होेत्या.
अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, उद्घाटक म्हणून तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याध्यापक ना. गो. थुटे, प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार गोसावी म्हणाले, मीसुद्धा पेन्शनर्स शिक्षकाचा मुलगा आहे. सेवानिवृतांविषयी आस्था आहे. कुटुंबाचे पालनपोषण केले. त्यांनी मुलांकडे सर्वस्वी सोपवून परावलंबी होऊ नये. त्यांनी कुटुंबात राहावे. पेन्शनर्सच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले, आपण संघटनेच्या कार्यात सदैव सोबत आहे. अडचणी असल्यास आपण त्या सोडविण्यास तत्पर असल्याचे सांगितले. याप्रसंगी तायक्वांडो क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल मिथीला आनंद जोगी या खेळाडूचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद पाध्ये यांनी सेवानिवृत्तांच्या समस्यांची माहिती दिली. संचालन संघटनेचे सचिव देवराव कांबळे, आभार सहसचिव देवराव पारखी यांनी मानले.

Web Title: Efforts to solve pensioners' problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.