शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे घरगुती विजेचा अमर्याद वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : जिल्ह्यातील उन्हाचा पारा पुन्हा भडकणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अधिक मागणी होत आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढेल तशी विजेची मागणी पुन्हा जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यात विजेची मागणी गेल्या आठवड्यात १४ मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली होती. त्यात दिवसागणिक वाढ होत गेली. उन्हाळ्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढल्याने मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे विजेची मागणी वाढली असली तरी मेरिट आॅर्डर डिस्पॅचमुळे राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महानिर्मितीच्या चार विद्युत केंद्रांना झिरो शेड्युलमुळे बंद ठेवावे लागले आहे. यात नाशिक, कोराडी, परळी व भुसावळ येथील वीजनिर्मिती केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या खापरखेडा, पारस, चंद्रपूर या तीन वीजनिर्मिती केंद्राबरोबरच उरण गॅस टर्बाईनच्या हायड्रो, सोलरची अशी महानिर्मितीची ३२९९ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. त्या तुलनेत खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी, धारीवाल, एस. डब्ल्यू. पी. जी. एल. आणि इतरांची मिळून ४७३४ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती १४०० मेगावॉटने जास्त आहे. सद्या महावितरणाची मागणी १५ हजार मेगावॉटच्या वर आहे. केंद्राच्या अखत्यारीतील वीज स्वस्त असल्याने महावितरणचा कल तेथील वीज खरेदी करण्याकडे असल्याचे दिसते.एकूणच राज्याची विजेची मागणी १७ हजाराच्या वर गेली असली तरी त्या तुलनेत इतर राज्यांची मागणी कमी असल्याने लॉकडाऊन असेपर्यंत विजेच्या मागणीची स्थिती जैसे थे असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. म्हणून महानिर्मितीचे संच आहे त्याच स्थितीत वीज निर्मिती करतील. त्यामुळे सद्यस्थितीत बंद असलेले संच अजूनही काही दिवस बंदच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.कुलर सुरू झालेकोरोनाची दहशत सुरू असतानाच काहींनी कुलर लावल्यास प्रशासन कारवाई करणार, अशी अफवा समाज माध्यमातून पसरविण्यात आली होती. परंतू ती फेक निघाल्याने कुलर सुरू झाले आहेत.

टॅग्स :electricityवीज