शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात

By admin | Updated: July 3, 2017 01:01 IST

तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास

राजुरा तालुका : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तुघलकी कारभारामुळे राजुरा तालुक्यात प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे राजुरा आणि कोरपना तालुक्यामधील केवळ सहा उद्योगांची नोंद आहे. कारखान्यातून होणारे प्रदूषण कमी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे योग्य नियमावली नाही. कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार होवून आयुष्यमान कमी होत आहे. लहान मुलांना विविध आजाराची लागण होत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत आहे. यामुळे कंपन्याचे प्रदूषण वाढतच आहे. वेकोलिच्या खाणींमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे. कोळशाच्या धुरामुळे सल्फर डॉयआॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईट, कार्बन डॉयआॅक्साईड, मोनो आॅक्साईड यांच्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये ५० टक्के रुग्ण श्वसनाचे आढळले आहे. धुरामुळे खोकला, दमा असे आजार होत असून प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. कोळसा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून निरी आणि आयआयटी यांच्या सर्वेमध्ये प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.