संविधानामुळेच टोपल्या विकणाऱ्या मातेचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:45+5:30

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी नगर येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार म्हणाले, आजच्या दिवशीच त्यांच्या चरणांनी चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली होती.

Due to constitution, the boy who sells the basket is in the polls | संविधानामुळेच टोपल्या विकणाऱ्या मातेचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

संविधानामुळेच टोपल्या विकणाऱ्या मातेचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवा विचार आणि दिशा दिली. प्रत्येक नागरिकांना समान अधिकार देणारे भारतीय संविधान दिले. या संविधानाचा आदर करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी एक टोपली विकणाºया मातेचा मुलगा चंद्रपूर विधानसभेत उमेदवार म्हणून उभा आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केले.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी नगर येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार म्हणाले, आजच्या दिवशीच त्यांच्या चरणांनी चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली होती. या घटनेला आता मोठा काळ लोटला असला तरी दीक्षाभूमीवरुन त्यांनी दिलेले विचार आजही समाजात परिवर्तन घडवीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार आपल्याला प्राप्त झाले असले तरी, ते चांगल्या कामी लावण्याची मोठी जबाबदारीही आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्याची गरज आहे आणि मीसुद्धा त्यासाठी कटिबध्द आहे, अशी ग्वाही याप्रसंगी बोलतांना जोरगेवार यांनी दिली.

Web Title: Due to constitution, the boy who sells the basket is in the polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.