शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेते, रेती तस्कर, गुटखामाफिया एलसीबीच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेते, रेती तस्कर व गुटखामाफिया यांच्याविरूद्ध धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन ...

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेते, रेती तस्कर व गुटखामाफिया यांच्याविरूद्ध धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत आठ ठिकाणी कारवाई करून अवैध दारू, रेती व सुंगधीत तंबाखू असा सुमारे ३२ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसत्राने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट तयार करण्यात आले असून, अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. बल्लारपूर पोलीस स्थानक हद्दीतील कारवा जंगल परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून २१ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी बापू रंगारी धम्मदीप चौक, अनिल मारशेट्टीवार बुद्धनगर, निखील रणदिवे, श्रीकांत कोडबल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमूर येथे सुंगधीत तंबाखू साठवून त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोहर पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गापूर पोलीस स्थानक हद्दीत चार ठिकाणी कारवाई करून दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून भागीरथ ठाकूर समतानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शेगाव रोड फाट्यावर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह सात लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसात आठ ठिकाणी केलेल्या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, सुरेश केमेकर, पंडित वऱ्हाडे, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमजद खान, चंदू नागरे, सुरेंद्र महोतो, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, कुंदनसिंह बावरी, प्रदीप मडावी, मयुर येरमे, गणेश मोहुर्ले, प्रांजल झिलपे आदींनी केली.