शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला इंजेक्शन द्यायचे कारण सांगून मागितली सिरिंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून घराबाहेर निघाल्या नव्हत्या, अशी माहिती सूत्राने ...

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून घराबाहेर निघाल्या नव्हत्या, अशी माहिती सूत्राने दिली. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु मृत्युच्या दिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली.

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्युला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही मृत्युचे गूढ उकलले नाही. परंतु डाॅ. शीतल यांनी मृत्युपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे. मात्र त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यामुळे अद्याप मृत्युचे कारण रहस्यमय बनले आहे. मृत्युचे नेमके कारण कळणार नाही तोपर्यंत डाॅ. शीतल यांची आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणाने केली, याचा शोध लावणे अवघड झाले आहे. त्यांनी आत्महत्या केली वा अन्य कारणाने मृत्यू झाला, याचाच शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाईल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याचा ताळमेळ डाॅ. शीतल यांच्या मृत्युपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाशी जोडण्याचे काम पोलीस करीत आहेत.

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

डाॅ. शीतल यांच्या मृत्युप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी काही पुरावे चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी दिल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कुत्र्याचे इंजेक्शन घेतल्याची अफवा

डाॅ. शीतल आमटे यांनी कुत्र्याला मारण्याचे इंजेक्शन घेतल्याची अफ‌वा होती. याची शहानिशा केली असता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील रुग्णालयातून कुत्र्याला इंजेक्शन द्यायचे असल्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. ते औषध नेमके कोणते याचाच उलगडा अद्याप न झाल्याने ही अफ‌वा हास्यास्पद असल्याचेही सूत्राने सांगितले.