शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, काही ठिकाणी गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली.

ठळक मुद्देवृक्ष, वीज खांब कोसळले : कोरोनाच्या संकटकाळात अवकाळीचे विघ्न, शेतमालाचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी मध्यरात्री चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह हा पाऊस सुमारे पाऊणतास झोडपला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. घरावरी टिना उडाल्या. विजेचे खांब कोसळले. परिणाम चंद्रपूरसह अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात राजुरा-गोवरी मार्गावरील मोठे वृक्ष उन्मळून पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीतील काटाघरासमोरील शेड कोसळल्याने येथे वेकोलिच्या काटाघरात कार्यरत असलेल्या आशिष बोभाटे या कर्मचाऱ्याची दुचाकी शेड कोसळल्याने मोडतोड झाली. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चिंचोली, वरोडा परिसरासह राजुरा तालुक्यातील बहुतांश गावात आलेल्या अवकाळी पावसासह वादळाने मोठे नुकसान झाले आहे.गोवरी येथील सुनील देवाळकर यांच्या शेतातील गोठयावरील टिना उडून गेल्या.तर गोवरी येथे विद्युत जनित्रावर मोठे झाड कोसळल्याने गोवरी परिसरातील वीज पुरवठा १२ तासानंतरही खंडित होता. काही शेतकऱ्यांनी कापूस पिकांसह शेतमाल अंगणात ठेवला होता. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.भद्रावती तालुक्यात गारपीटभद्रावती : भद्रावती तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस बरसला. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. यामुळे शेतकºयांसह अनेक घरांचे तसेच शासकीय मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील चिरादेवी येथे पावर ग्रिड येथून परडी येथे जाणारे तीन टावर खाली पडल्याने पारेशन कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या शेतमालाचेही नुकसान झाले असून गावासह शहरातसुद्धा घरांची छते तसेच जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले. वेकोलि एकता नगर परिसरात तबल आठ झाडे उन्मळून पडली. काही भागाचे विद्युत खांब पडल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले.आंबा पिकांना मोठा फटकापळसगाव : पळसगाव परिसारातील पळसगाव, कळमना, आमडी इतर भागात काही शेतकºयांनी आपल्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना केली. बहर जाऊन आंबे लागायला सुरुवात झाली. परंतु शनिवारी पहाटे पडलेल्या वादळी पावसामुळै आंबे पूर्णत: परिपक्व होण्याच्या आधीच खाली पडले. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, पळसगाव परिसरात आमडी गावात अनेक शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीबरोबरच लाल मिरचीचे उत्पादन घेतले. लॉकडाउनमुळे मिरची घरातच पडून आहे. बाहेर ठेवलेली मिरची पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बल्लारपुरातील वीज पुरवठा खंडितबल्लारपूर : शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारपुरात वादळासह मुसळदार पावसाने हजेरी लावली. वादळ व पाऊस सुमारे ५ वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान त्या काळात वीज पुरवठाही बंद होता. यात रस्त्यावरील अनेक झाडे पडली. अचानक आलेल्या या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस