शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट नियोजनामुळेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST

कोरोना संकटावर मात करण्यासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देऊन कैद्यांची तपासणी, त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी जे जीवावर उदार होून अहोरात्र काम करीत आहेत त्यांच्यासाठी दुप्पट वेतन देण्याची आग्रही मागणी खा. बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देखासदार : कोरोनाच्या संकटकाळात गरजवंतांना मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राची रेड, आरेंज व ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन व या कामी कार्यरत आरोग्य, पोलीस, सफाई, कोल, वीज या अत्यावश्यक सेवांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी कौतुक केले आहे. सोबतच लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून त्यांना मदतीचा हातही दिला आहे.खा. धानोरकर यांनी कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत ५० लाख रुपये मंजूर केले व वेकोलीतर्फे देखील चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याला प्रत्येकी २५ लाख रुपये मिळवून दिलेत. आमदार प्रतिभा धानोरकर यांनीदेखील स्थानिक निधीमधून ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपायायोजनाबाबत खा. बाळू धानोरकर हे जिल्हाधिकारी, डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, चंद्रपूर शहर मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी सातत्याने संपर्क व आढावा बैठकीच्या माध्यमातून माहिती घेत मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.२ एप्रिलपासून लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रात दररोज १२ हजार फूड पॅकेटस वितरित होत आहे. यात मागणीनुसार अतिरिक्त फूड पॅकेट्सदेखील पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत १५ हजार कुटुंबापर्यंत धान्य पुरवठा केलेला असून आता लॉकडाऊन कालावधी ३० एप्रिलपर्यंत झाल्याने पुन्हा १५ हजार धान्य किट वाटप करण्याची तयारी खा. धानोरकर यांनी केली आहे.याबरोबरच वेकोली वणी क्षेत्र कार्यालय येथे सायवन गावातील स्त्री-पुरुषांना धान्य किट वाटप त्यांनी केले. तसेच उडिया मोहदा येथील गरीब कुटुंबाच्या मदतीला ते धाऊन गेले व तेथे औषधीसाठी अर्थसहाय्य व धान्य वाटप करुन मनपा प्रशासनाला सूचना करुन तेथील १०४ गरजू कुटुंबांना धान्य वाटप किट त्वरित उपलब्ध करुन दिला. भद्रावती, मूल येथे शिवभोजन केंद्र नव्याने सुरु करण्यास पुढाकार घेत खा. धानोरकर यांनी वरोरा येथे अतिरिक्त शिवभोजन केंद्र मंजूर केले.कोरोना संकटावर मात करण्यासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देऊन कैद्यांची तपासणी, त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी जे जीवावर उदार होून अहोरात्र काम करीत आहेत त्यांच्यासाठी दुप्पट वेतन देण्याची आग्रही मागणी खा. बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस