निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:32+5:30

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची तसेच मतदाराच्या आकडेवारीविषयीची माहिती दिली.

District administration ready for election | निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार । जिल्ह्यात १८ लाख ७२ हजार मतदारांची नोंदणी, २७ पर्यंत प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झालेली असून २७ सप्टेंबरपर्यंत उर्वरित नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूरचे ६४ टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची तसेच मतदाराच्या आकडेवारीविषयीची माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून यांची एकूण मतदार संख्या १८ लक्ष ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये नऊ लाख ११ हजार ९३८ महिला मतदार असून नऊ लाख ६० हजार ८२७ पुरुष मतदार आहेत. तर २२ इतर मतदार असून एकूण मतदारांपैकी १७०९ मतदार सेनादलातील आहे. २७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असून उर्वरित मतदारांना नमुना ६ अर्ज भरून मतदार म्हणून नोंदणी करता येईल.दरम्यान, या पार्श्वभूमीवर कुणीही आचारसंहिता भंग करू नये, असे आवाहनही ङॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात २०९८ मतदान केंद्र
जिल्ह्यात सध्या २०९८ मतदान केंद्र असून यातील २८ मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र म्हणून तर एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चार हजार पोलीस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येईल. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे.

Web Title: District administration ready for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.