शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. च्या १५५ शाळांमधील अंधार दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

राजेश मडावी चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी ...

राजेश मडावी

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी अन्य पर्यायच नसल्याने सांगून जि. प. ने हात वर केले. त्यामुळे अखेर राज्य शासनानेच सादील अनुदानातून ४ लाख १५ हजारांचा निधी गुरूवारी मंजूर केली. यातून शाळांचा अंधार दूर होणार आहे.

स्थानिक स्वराज संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांना नियमित वीज पुरवठा करूनही बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाने या शाळांचा पुरवठा मागील वर्षाच्या शैक्षणिक सत्रातच खंडित केला होता शैक्षणिक उपक्रम

विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही हात वर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील १५ प्राथमिक शाळा अंधारात आहेत. जि. प. ने शाळांना अनुदान देण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यातील अनेक जि. प. अध्यक्षांनीहा प्रश्न राज्य शासनाकडे मांडला. भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षीच्या वेत खर्चाच्या ४ टक्के सादीलवार खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. अखेर जि. प. शाळांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सादील खचार्चा पयार्य स्वीकारला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ४ लाख १५ हजारांचा निधी मंजूर झाला. हा निधी कायमस्वरूपी खंडित झालेल्या शाळांचे वीज बिल भरणा करण्यास वापरला जाणार आहे.

बॉक्स

असे आहे अनुदानाचे स्वरूप

वीज वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी खंडित केलेल्या १५५ जि. प. शाळांचे वीज बिल सादील खचार्तून केल्या जाईल. एक हजार रूपये प्रति शाळा प्रति महिने मयार्देत इतर निधीतून बीेल भरले नसल्यास सादील अनुदानातून हा खर्च भागविता येणार आहे. शाळांनी देयक भरल्यानंतर वीज वितरणचे अधिकारी ही माहिती शिक्षण संचालकांना देतील.