शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा उमेदवाराच्या रूजू आदेशाची मुख्याधापकाकडून अवहेलना

By admin | Updated: March 11, 2015 01:05 IST

अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे.

चंद्रपूर: अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी खुद्द शिक्षण खात्याचीच दिशाभूल केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.केळझर येथील आनंद विद्यालयात सुभाष महादेव कानमपल्लीवार यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा दावा होता. या नुसार शिक्षणाधिकारी कार्यालय आणि संस्थाचालक व मुख्याध्यापकांकडे पत्रव्यवहार केल्यावर तेथील मुख्याध्यापक अनिल मन्साराम कामडी यांनी २ सप्टेंबर २०१४ रोजी सुभाष कानमपल्लीवार यांना लिपिक पदावर रूजू करून घेतले होते. शाळा समितीच्या ठराव क्रांक दोन नुसार रूजू करून घेत असल्याचे पत्रही त्यांनी त्याच दिवशी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविले होते. या काळात लिपिक या नात्याने कानमपल्लीवार यांनी शाळेतील सर्व पत्रव्यवहार आणि कार्यालयीन कामकाज सांभाळले. मात्र सहा महिने होत आले तरीही मुख्याध्यापकांनी नियुक्ती आदेश काढला नव्हता. एवढेच नाही तर पदमान्यतेचा प्रस्तावही पाठविला नव्हता. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनही यासंदर्भात वारंवार स्मरणपत्र देऊनही मुख्याध्यापकांकडून टाळाटाळच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी १० मार्चला सकाळपाळीतील शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक कामडी यांनी अचानकपणे सेवा समाप्तीचा आदेशच लिपिक सुभाष कानमपल्लीवारच्या हातात दिला. या प्रकाराने भांबावलेल्या लिपिकाने मुख्याध्यापकांना विचारणा केली, मात्र काहीही न सांगता, उद्यापासून शाळेत यायचे नाही, असे सांगून बोळवण केल्याचे कानमपल्लीवार यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)