शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था

By admin | Updated: March 20, 2017 00:33 IST

येथील ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.

कार्यालयातील अनेक पदे रिक्त : नहर दुरुस्त करण्याची मागणीसिंदेवाही : येथील ब्रिटीशकालीन घोडाझरी सिंचाई उपविभागाच्या उपविभागीय (उपअभियंता) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.मागील दहा वर्षापासून या विभागाच्या उपविभागीय निवास्थान व कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्तीकडे तसेच नहर दुरुस्तीकडे व परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयीन इमारत व निवासस्थानाच्या सभोवताल अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून आहे. सिंदेवाही येथे ब्रिटीश राजवटीतील सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या शासकीय उपअभियंत्याच्या निवासस्थानाला १३५ वर्ष पूर्ण होत आहे. या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटीश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाही वरुन घोडेस्वार होवून ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला ब्रिटीशांनी घोडे बांधण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था तसेच निवासस्थानाच्यापुढे व मागे बगीचा तयार केला होता. तसेच बैठकीकरिता एक मोठा खोलीचे बांधकाम केले आहे. मात्र ब्रिटीशकालीन शासकीय निवासस्थान जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने नवीन निवासस्थान व कार्यालयीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला होता. या उपविभागातंर्गत नवीन निरीक्षणगृह बांधण्यात आले आहे. त्या निरीक्षण गृहात १५ वर्षापूर्वी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व शासकीय अधिकारी मुक्काम करीत होते. परंतु पाटबंधारे विभागाने निरीक्षणगृहातच उपविभागीय कार्यालय थाटले आहे. त्यामुळे निरीक्षणगृह (विश्रामगृह) बंद झाले आहे. त्यामुळे सिंचाई उपविभागीय कार्यालयाची दुर्दशा झाली आहे. तसेच या कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने घोडाझरी सिंचाई उपविभाग कार्यालय रामभरोसे झाले आहे. (पालक प्रतिनिधी)निरीक्षणगृहातील बगीच्याची दुर्दशासिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर घालणारे येथील घोडाझरी निरीक्षण गृहाजवळील बगीच्याची दुर्दशा झाली आहे. सदर निरीक्षणगृह व बगीचा हे सिंदेवाहीकराचे आकर्षण होते. परंतु घोडाझरी सिंचाई उपविभागीय कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे उपविभागीय कार्यालय निरीक्षणगृहात स्थानांतरित करण्यात आले. पूर्वी या निरीक्षण गृहात लोकांची सतत वर्दळ असायची. निरीक्षण गृह बंद झाल्यामुळे या निरीक्षण गृहासमोर असलेला बगीचा ओसाड झाला आहे. या बगीच्यातील विविध प्रकारची फुलझाडे नष्ट झाली आहेत. बगीच्या सभोवताल गवत वाढले आहेत. बगीच्यातील कारंजे व गार्डन लाईन बंद आहेत. आता या बगीच्यात कुणीही फिरकत नाही. याशिवाय परिसरात पथदिवे नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.गडमौशी नहराची दुर्दशायेथे घोडाझरी सिंचाई उपविभागाअंतर्गत गडमौशी तलावाचे नहर आहे. या नहराद्वारे लोनवाही शिवाजी चौक, जुना बसस्थानक व इंदिरा नगर जवळील शेत जमीनीला पाणी पुरवठा केला जातो. काही महिण्यापूर्वी घोडाझरी सिंचाई उपविभागाने या नहरावरील टाकलेले स्लॅब जेसीबीने काढून टाकले. त्यामुळे नहराच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे पसरलेले आहेत. या नहराला लागून विविध व्यवसायिकांची दुकाने, खासगी दवाखाना, बँक व पतसंस्था आहेत. या परिसरात मातीचे ढिगारे टाकल्यामुळे ग्राहकांना दुकानात जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे.घोडाझरी सिंचाई उपविभागातंर्गत सिंदेवाही येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान व उपविभागीय कार्यालय इमारतीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग यांचेकडे पाठविला आहे. तसेच गडमौशी नहर दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आले आहे. प्रस्ताव मंजूर होताच नहर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.- एन.एम. रिजवी, उपविभागीयअधिकारी घोडाझरी सिंचाईउपविभाग, सिंदेवाही