शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्राअभावी प्रवेशासाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे. परंतु, अनेक शाखेतील अनेक प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवसतिगृहात अडकले कागदपत्र : ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विलगीकरण कक्षासाठी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ताब्यात घेवून विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे लगबगीने वसतिगृह सोडावे लागले. मात्र त्याचे मूळ कागदपत्र वसतिगृहातच लटकून आहेत. वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्याने वसतिगृहात जाण्यास बंदी आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचण जात आहे.चंद्रपूर येथे आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक व दोन तर मुलांचे वसतिगृह क्रमांक दोन वसतिगृह आहे. या तिन्ही वसतिगृलहात जिल्ह्यातील अकरावी ते पदवीधर शिक्षण घेणारे सुमारे ५०० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मार्च महिन्यात कोरोना विषाणूची लागण होताच शाळा-महाविद्यालये बंद झाली. त्यामुळे तिन्ही वसतिगृहातील विद्यार्थी मिळेल त्या साधनाने स्वगृही गेले. मात्र आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे. परंतु, अनेक शाखेतील अनेक प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच काही जणांना मुळ कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावयाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्राची गरज आहे. परंतु, वसतिगृहात जाण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण जात आहे.वसतिगृह खाली करण्याची मागणीवसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाणे कठीण झाले आहे.त्यांना कागदपत्राची आवश्क्यता असल्याने वसतिगृह खाली करुन निर्जंतुकीकरण करुन द्यावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळांनी प्रकल्प अधिकाऱ्याला निवेदनातून केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम उईके, जिल्हा सचिव राजू सिडाम, सुरज निमसरकार, जितू पेंदाम, माणिक किन्नाके, मोनाली घरत, आश्विना शेरकुरे, प्रतीक्षा चौधरी, मृणाली चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या